मुंबई उच्च न्यायालयाचे राज्यशासनाला निर्देश
मुंबई – १९ ते २७ एप्रिल या कालावधीत जैन पंथियांच्या होणार्या आयंबील उत्सवानिमित्त जैन मंदिरांमध्ये जाऊन प्रसाद घेण्यासाठी अनुमती मिळावी, यासाठी जैन पंथीय ट्रस्टकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. यावर १५ एप्रिल या दिवशी न्यायमूर्ती सुरेश गुप्ते आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपिठापुढे सुनावणी झाली. ‘उत्सवाच्या कालावधीत मंदिरे उघडण्याची किंवा तेथे प्रसाद ग्रहण करण्याची आमची मागणी नाही, तर मंदिराच्या आवारातून प्रसादाची पाकिटे घेऊन जाण्याची अनुमती मिळावी’, असे याचिकेत म्हटले आहे. यावर न्यायालयाने राज्यशासनाला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.