सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी डाव्या दंडाला स्पर्श केल्यावर आमवातामुळे दुखत असलेल्या शरिराच्या डाव्या बाजूचे दुखणे ७० ते ७५ टक्के एवढ्या प्रमाणात न्यून होणे

‘मला आमवाताचा त्रास आहे. माझ्या शरिराची डावी बाजू अधिक प्रमाणात दुखते. १५.६.२०१९ या दिवशी ‘अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशना’च्या अंतर्गत शिबिराचे पहिले सत्र संपल्यावर साधक एका सभागृहातून दुसर्‍या सभागृहात जातांना तेथील संत बाहेर येत होते. त्या वेळी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर माझ्याकडे बघून हसल्या आणि त्यांनी त्यांचा डावा हात माझ्या डाव्या दंडाला लावला. खरेतर मी या पूर्वी त्यांच्याशी कधी बोलले नव्हते. मला सद्गुरूंचा स्पर्श झाला; म्हणून मला पुष्कळ आनंद झाला. त्या वेळी मनात ‘धन्य धन्य हम हो गये गुरुदेव’, या ओळी आल्या. त्या दिवसापासून अजूनही मी त्या प्रसंगाचे आलंबन केल्यावर माझे मन स्थिर होऊन माझी भावजागृती होते.

सद्गुरु अनुताईंनी स्पर्श केल्यापासून माझ्या शरिराची डावी बाजू दुखण्याचे प्रमाण ७० ते ७५ टक्के एवढ्या प्रमाणात न्यून झाले आहे. या अनुभूतीसाठी मी परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्याप्रती कोटी कोटी कृतज्ञ आहे.’

– सौ. अंजली मणेरीकर, पुणे (२२.६.२०१९)

येथे प्रसिद्ध  करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक