आज मानवाला जग उद्ध्वस्त करणारी भौतिक प्रगती हवी कि जगाला चिरशांती देणारी वैदिक जीवनपद्धती हवी ?

‘हे जगा, तू भौतिक शोध कितीही लावलेस आणि घरबसल्या दूरदूरचे ऐकलेस अन् पाहिलेस, स्वल्प (अल्प) काळात दूरची मजल गाठलीस, यंत्राच्या साहाय्याने अल्पावधीत विपुल ऐहिक सुखाची साधने तू कितीही अपार (अधिक) निर्माण केलीस, आकाशात उडालास आणि तेथे यथेच्छ फिरलास, तरी तुला नितांत शांतीचा क्षण लाभणे दुर्लभ ! शाश्‍वत सुखाचा लाभ होणे दुरापास्त ! अचल समाधान लाभणे अगदीच अशक्य ! हे निर्भेळ (निर्विवाद) सत्य आहे. उलट तुझ्या राक्षसी कृत्यांना त्यामुळे ऊत येत राहील. कामक्रोधादि विकार बेफाम वाढतील आणि आपल्या अल्पस्वार्थासाठी देशच्या देश उद्ध्वस्त करण्याची स्व-परधातुक (स्पर्धातुक) प्रवृत्ती वणव्यासारखी तुझ्या अंतःकरणात सदैव पेटत राहिल. ‘खरे सुख हवे असल्यास तू वैदिक सिद्धांताकडे बघ. तो तुला शाश्‍वत सुखाचा लाभ करून देऊन, तुझा जीवनकलह पार मावळून टाकून केवळ सुखाच्या साम्राज्यामध्ये नित्य तृप्तीने नांदवील.’

– प.प. भगवान श्रीधरस्वामी, (संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, वैशाख शके १९०८, मे १८८५)