धनबाद (झारखंड) येथे हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन
अशी मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे !

झारखंड (धनबाद) – गेल्या काही वर्षांत देशभरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक आक्रमणे होत आहेत. त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत आहे. यात प्रतिदिन वाढ होत आहे. काही दिवसांत देहली आणि केरळ येथे अशा हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करण्यात आल्या. हत्या करणारे धर्मांध आणि त्यांचे सूत्रधार अन् या घटनांना दडपण्याचा प्रयत्न करणार्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन धनबाद येथील उपायुक्त कार्यालयामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमरजित प्रसाद आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता सुदीप गुप्ता यांनी दिले.
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांकडून स्वागत !