राष्ट्रभक्त आणि धर्मनिष्ठ ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. जयेश ओंकार कापशीकर (वय १४ वर्षे) याची लक्षात आलेली काही दैवी गुणवैशिष्ट्ये !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. जयेश ओंकार कापशीकर एक आहे !

‘२२.१.२०२१ या दिवशी कु. जयेश कापशीकर याने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची घोषणा करण्यात आली. त्यानिमित्त त्याची लक्षात आलेली त्याच्या अन्य समवयस्क मुलांपेक्षा वेगळेपण दर्शवणारी काही गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ –  परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. जयेश कापशीकर

१. ‘समाजाला खरा इतिहास कळावा’, याची तळमळ

१ अ. पाचव्या इयत्तेत शिकत असतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या खर्‍या इतिहासाच्या पुनर्लेखनाला प्रारंभ करणे : जयेश पाचव्या इयत्तेत शिकत असतांना त्याने ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पुस्तकात खोटा इतिहास लिहिल्याचे वाचले होते. तेव्हा त्याला वाटले, ‘आता समाजाला खरा इतिहास आपणच सांगायला हवा.’ त्याने ‘राजा शिवछत्रपती’ आणि अन्य पुस्तके वाचून काढली. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास स्वतःच लिहायला घेतला. तो अनुमाने वर्षभर अभ्यास करून इतिहास लिहित होता. त्याने २०० पानी वही भरेल, इतके लिखाण केले. त्याने त्या वहीत अफझलखानवध इत्यादी चित्रेही रेखाटली होती.

श्री. सागर निंबाळकर

‘इतक्या लहान वयात समष्टीला खरा इतिहास कळावा’, असे वाटणे हेच जयेश ‘दैवी बालक’ असल्याचे दर्शवते ना !

१ आ. विरोधकांची बाजू जाणून घेणे : तो आठव्या इयत्तेत शिकत असतांना त्याने एकदा आईला सांगितले, ‘‘आपण हिंदुद्वेष्टे लेखक हिंदूंच्या विरोधात काय लिहितात ? कसे लिहितात ?’, याचाही अभ्यास करायला हवा. विरोधकांची बाजू समजून घेता आली, म्हणजे आपल्याला समाजाला योग्य-अयोग्य सांगता येईल.’’

२. पौराणिक आणि ऐतिहासिक पुस्तके वाचनाची आवड

२ अ. लहान वयातही ‘काय वाचले पाहिजे’, याची जाण असणे : जयेशला लहानपणापासून वाचनाची आवड आहे. त्याच्या वयाच्या १४ व्या वर्षाच्या वाढदिवसाच्या दिवशी जयेशची आई त्याला भेट म्हणून पुस्तके देणार होती. तेव्हा त्याने शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘राजा शिवछत्रपती’, तसेच ‘इस्रायलची मोसाद’ ही पुस्तके मागवली. ही दोन्ही पुस्तके अनुक्रमे वीरवृत्ती आणि राष्ट्रप्रेम वाढवणारी आहेत. ‘एवढ्या लहान वयात काय वाचले पाहिजे ?’, हे त्याला चांगलेच समजले आहे’, असे आमच्या लक्षात आले. आम्ही त्याच्या वयाचे असतांना विनोदी कथा, कादंबर्‍या अशी, जी पुस्तके मिळाली, ती वाचत होतो.

२ आ. वाचलेले अंतर्मनात कोरले जाणे : जयेश पुस्तक मनापासून वाचतो. त्याला वाचनाची केवळ आवड नाही, तर ते वाचन आचरणात आणण्याची त्याची सहजवृत्ती आहे. त्याने वाचलेल्या प्रत्येक पुस्तकातील ज्ञानाचा त्याच्या बुद्धीवर झालेला संस्कार त्याच्या कृतीतून जाणवतो. त्याने ‘सहा सोनेरी पाने’ हे पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यात राष्ट्रप्रेम वाढल्याचे त्याच्या कृतींतून दिसून आले. त्याने ‘युगंधर’ वाचल्यानंतर त्याला सर्वत्र श्रीकृष्णाचे दर्शन होऊ लागले. त्याला श्रीकृष्णाचा काळ अनुभवल्यासारख्या अनुभूतीही येऊ लागल्या.

३. प्रेमभाव

जयेश पुण्याला गेल्यावर तेथून येतांना तो माझ्यासाठी खाऊ घेऊन येतो. त्याला वाढदिवसाला मिळालेले पुस्तक त्याने वाचले. त्यानंतर नंतर त्याने आईला विचारले, ‘‘आई, सागरदादा मला एवढी पुस्तके वाचायला देतात. माझे हे पुस्तक मी त्यांना वाचायला देऊ का ?’’ त्याच्यात प्रेमभाव, विचारून करण्याची वृत्ती आणि आज्ञाधारकपणाही आहे.

४. स्थिर

जयेशला गेल्या वर्षी कांजिण्या झाल्या होत्या. त्याला १५ दिवसांपेक्षा अधिक काळ खोलीत रहावे लागणार होते. त्याला पहायला जातांना मला शंका होती, ‘मुलांना शाळेत आणि आश्रमात खेळण्या-बागडण्याची हौस असते. जयेशला एका खोलीत बांधल्यासारखे तर होणार नाही ना ? तो पूर्ण वेळ खोलीत काय करत असेल ? तो अस्वस्थ तर होणार नाही ना ?’; पण माझ्या सगळ्या शंका खोट्या ठरल्या. मी जयेशला भेटल्यावर माझ्या लक्षात आले, ‘त्याने सकारात्मकतेने परिस्थिती स्वीकारली आहे. त्याचे मन पूर्वीसारखेच निर्मळ आहे. तो स्थिर आहे आणि या कालावधीत तो ग्रंथांच वाचन करणार आहे.’ त्याची लहान वयातील ही स्थिरता मला अंतर्मुख करणारी ठरली.

५. कु. जयेशच्या निमित्ताने एक राष्ट्र आणि धर्मनिष्ठ संतांची जडण-घडण पहायला मिळणार असणे

आजवरच्या इतिहासात राष्ट्रभक्तांची प्रखर राष्ट्रनिष्ठा त्यांच्या कार्याला ईश्‍वरी अधिष्ठान नसल्याने वाया गेल्याची अनेक उदाहरणे पाहिली आहेत; मात्र जयेशसारख्या एका राष्ट्रभक्त आणि धर्मनिष्ठ साधकाने ६१ टक्के पातळी गाठल्याचे अनुभवले. पुढे त्याची अशीच जडण-घडण होऊन तो संतपदी विराजमान झाल्यानंतर ते इतिहासात एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण ठरेल !

‘अशा राष्ट्रभक्त आणि धर्मनिष्ठ दैवी बालक असलेल्या साधकाच्या साधनेची संतपदापर्यंतची वाटचाल आपल्या सर्वांना पहायला मिळणार आहे’, याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१.२०२१)

‘पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी कु. जयेश कापशीकर याने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची घोषणा करणे’, हेही वैशिष्ट्यपूर्णच !

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

‘सनातनच्या रामनाथी आश्रमात काही वर्षांपूर्वी ‘गुरुकुल’ स्थापन करण्यात आले होते. त्याच्या मुख्याध्यापिका म्हणून पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांच्याकडे दायित्व होते. कु. जयेशची आतापर्यंतची जडणघडण सनातनच्या रामनाथी येथील गुरुकुलासम आश्रमात चैतन्यामुळे झाली; मात्र ‘त्याने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची घोषणा येथील पूर्वीच्या गुरुकुलाच्या मुख्याध्यापिकांनी, म्हणजेच पू. (सौ.) अश्‍विनीताईंनी देवद येथील आश्रमात केली’, हा एक निराळा संयोग म्हटला पाहिजे. आता जयेशला लवकर संतपद गाठण्यासाठी पू. (सौ.) अश्‍विनीताईंचे सतत मार्गदर्शन मिळेल.’ – श्री. सागर निंबाळकर

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक