
काबूल (अफगाणिस्तान) – इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी जलालाबाद येथे आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी केंद्रांवर काम करणार्या ३ महिलांची हत्या केली, तर एक महिला घायाळ झाली. या तिघीही १८ ते २० वयोगटातील होत्या. कार्यालयातून घरी जातांना त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले. या तिघी तुर्कस्तान आणि भारत येथील नाटक अन् मालिका यांचे स्थानिक भाषा ‘दारी’ अन् ‘पश्तू’ यांमध्ये भाषांतर करत होत्या. पोलिसांनी आक्रमण करणार्या आतंकवाद्यांना पकडले असून त्यांनी ते ‘तालिबानी’ असल्याचे म्हटले आहे; मात्र तालिबानने या आक्रमणामागे त्यांचा हात असल्याचा आरोप फेटाळला आहे. त्यानंतर इस्लामिक स्टेटने त्याचे दायित्व स्वीकारले आहे.
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Stray Dogs Attack : भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात घायाळ झालेल्या मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश
हत्येच्या घटनेला विरोध करणार्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !
US Iran War : इराणमधील भारतियांनी शक्य तितक्या लवकर भारतात परतावे ! – भारत
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !