केरळमध्ये संघ आणि धर्मांध राजकीय पक्ष एस्.डी.पी.आय. यांच्यातील हाणामारीत १ स्वयंसेवक ठार !

धर्मांध राजकीय पक्ष असणार्‍या एस्.डी.पी.आय.वर केंद्र सरकारने बंदी घालावी, अशी मागणी संघासह सर्व हिंदुत्वनिष्ठांनी केली पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

संघाचे नंदू नामक स्वयंसेवक

अलप्पुझा (केरळ) – येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि धर्मांध राजकीय पक्ष सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत संघाचे नंदू नामक स्वयंसेवक ठार झाले. येथील चेर्थला भागाजवळ नगमकुलनगरा परिसरात ही हाणामारी झाली.

यात आणखी काही जण घायाळ झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी एस्.डी.पी.आय.च्या ८ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. एस्.डी.पी.आय.ही जिहादी संघटना पी.एफ्.आय.ची राजकीय संघटना आहे.

या घटनेनंतर केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन् यांनी या हत्येसाठी पी.एफ्.आय.ला उत्तरदायी ठरवले आहे. या घटनेच्या विरोधात भाजप आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटन यांनी २५ फेब्रुवारीला बंदचे आवाहन केले होते.