रेल्वेकडून ‘आय पे’ सेवा कार्यान्वित

तात्काळ बुकिंगची आणि रिफंडचीही सुविधा

नवी देहली – भारतीय रेल्वेने आय.आर्.सी.टी.सी.- आय पे (IRCTC-iPay) नावाची नवीन पेमेंट गेटवे सेवा कार्यान्वित केली आहे. या माध्यमातून प्रवाशांना तिकीट बुकिंग करता येणार आहे.

आय.आर्.सी.टी.सी.-आय पे याद्वारे प्रवाशांना तिकिटांसाठी पेमेंट करण्यासाठी  त्यांच्या बँक खात्याच्या डेबिट कार्ड किंवा अन्य एखाद्या पेमेंट फॉर्मचा वापर करण्याची अनुमती आणि अन्य डिटेल्स द्यावे लागणार आहेत. या माध्यमातून प्रवासी काही सेकंदांत तिकीट बुकिंग करू शकणार आहेत. एकदा दिलेली माहिती भविष्यातील ऑनलाईन व्यवहारांसाठीही वापरता येऊ शकणार आहे. यासह आय.आर्.सी.टी.सी.चे संकेतस्थळ किंवा अ‍ॅपद्वारे करण्यात आलेले तिकीट बुकिंग रहित केल्यानंतर आय.आर्.सी.टी.सी.-आय पे द्वारे त्वरित पैसे परतही मिळणार आहेत.