सुदैवाने जीवितहानी नाही
ठाणे – कसार्याजवळ रेल्वे रुळाच्या बाजूला गवताला आग लागल्याने नंदीग्राम एक्सप्रेसच्या डब्याला आग लागली. यामुळे आतील प्रवासी जीव मुठीत घेऊन खाली उतरले. अनेक प्रवाशांनी रेल्वेतून खाली उड्या मारल्या. ९ नोव्हेंबर या दिवशी ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्याचे लक्षात येताच नंदीग्राम एक्सप्रेस सिग्नलजवळ थांबवण्यात आली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. सर्व प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.