मी एका सरकारी रुग्णालयामध्ये गेलो होतो. तेव्हा तेथे लागलेल्या विज्ञापनांमध्ये खालील प्रकारे भेद आढळून आला. कोणत्याही शासकीय योजनेच्या विज्ञापनामध्ये अल्पसंख्यांक (मुसलमान) कुटुंबांचे छायाचित्र असते, तर कुटुंब नियोजनाच्या विज्ञापनामध्ये जाणूनबुजून हिंदु कुटुंबे दाखवली जातात. यातून एक प्रकारे ‘हिंदूंची लोकसंख्या पुष्कळ असून त्यांनी त्यांची लोकसंख्या नियंत्रणात आणायला हवी’, असे हिंदूंच्या मनावर बिंबवले जाते. प्रत्यक्षात हिंदूंची लोकसंख्या घटून अल्पसंख्यांकांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी काही राज्यांतील गावांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक होत चालले आहेत. शासनाने वस्तूस्थिती मांडणे अपेक्षित आहे. शासनाने ‘हम पांच हमारे पचास’ असे मानणार्या अल्पसंख्यांकांना कुटुंब नियोजनाच्या विज्ञापनामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करायला हवा.
– नीलेश सुर्वे, रामनाथी, गोवा.