२८.१.२०२१ या दिवशी असलेल्या पू. (श्रीमती) शालिनी नेने यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने…
पौष पौर्णिमा (२८.१.२०२१) या दिवशी पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजींचे वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या कन्येने लिहिलेले त्यांच्या सहवासातील स्मृतीक्षण येथे दिले आहेत.
१. पू. नेनेआजींच्या शारीरिक तक्रारी आधुनिक वैद्य हेमंत राणे यांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर दूर होणे
आईला पूर्वी अनेक वर्षे प्रकृतीच्या वेगवेगळ्या तक्रारी होत्या. आधुनिक वैद्य हेमंत राणे यांच्या दूरभाषवरील मार्गदर्शनामुळे आईच्या सर्व तक्रारी नाहीशा झाल्या. त्यामुळे मला पुष्कळच साहाय्य झाले.
२. पू. नेनेआजी सनातन संस्थेच्या देवद येथील आश्रमात निवासाला जाणे, तेथील आधुनिक वैद्यांच्या औषधोपचारांनी त्यांचे जीवन सुखाने व्यतीत होणे आणि आश्रमातील सर्वांचे प्रेमळ वागणे नेहमीच लक्षात रहाणे
आई सनातनच्या देवद आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या निमंत्रणामुळे रहायला गेली. ती देवद आश्रमात रहायला गेल्यानंतर होमिओपॅथी वैद्य मेहता आणि आधुनिक वैद्य कुलकर्णी यांच्या औषधोपचारांमुळे तिचे तिथले जीवन सुखाने व्यतीत झाले आणि त्यामुळे माझेही ! त्यासाठी मी आपल्या सर्वांची नेहमीच ऋणी राहीन ! आश्रमातील परात्पर गुरु पांडेबाबा, सर्व संत, साधिका आणि साधक या सर्वांची प्रेमळ वागणूक अन् जपणूक माझ्या नेहमीच लक्षात राहील.
३. तज्ञ ज्योतिषांच्या भाकितांनुसार पू. नेनेआजींचे आयुष्य ९३ वर्षांचे असणे; मात्र देवद आश्रमातील वास्तव्यामुळे ते ३ वर्षांनी वाढले, असे लक्षात येणे
मुख्य म्हणजे देवद आश्रमात राहिल्यामुळे आईचे आयुष्य ३ वर्षांनी वाढले, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. आईला तिचे आयुष्य किती आहे ?, हे जाणून घेण्याची फारच इच्छा होती. तिच्या हट्टामुळे मी दोन चांगल्या ज्योतिषांना तिची पत्रिका दाखवली होती. त्यांनी आईला ९३ वर्षांचे आयुष्य आहे, असे सांगितले होते. यातील एक ज्योतिषी पुण्याचे आणि दुसरे मुंबईचे होते. ही हकीकत वर्ष २००८ मधील आहे. या दोन्ही ज्योतिषांची सर्व भाकिते तंतोतंत खरी ठरतात, असा माझ्या परिचितांचाही अनुभव आहे. आईचे मृत्यूसमयी वय ९६ वर्षे होते. त्यामुळे मी निश्चितपणे सांगू शकते, सनातनच्या देवद आश्रमात राहिल्यामुळे आईचे आयुष्य ३ वर्षांनी वाढले. त्यामुळे तिला साधना करायलाही ३ वर्षे अधिक मिळाली, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे !
जय गुरुदेव !
– श्रीमती अनुपमा देशमुख (मुलगी), पुणे (११.१.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |