अकोला येथील मृदंगाचार्य श्रीहरी महाराज शेळके यांचे निधन

श्रीहरी महाराज शेळके

अकोला, ९ जानेवारी (वार्ता.) – महाराष्ट्रभूषण समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृती महाराज देशमुख यांचे लाडके मृदंगाचार्य आणि ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांचे स्नेही श्रीहरी महाराज शेळके ठाणगावकर (वय ३० वर्षे) यांचे ९ जानेवारी या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. श्रीहरी महाराज यांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, अशी प्रतिक्रिया ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांनी व्यक्त केली.