१३ जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत देऊळ बंद
सातारा – कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरीदेवीची यात्रा रहित करण्यात आली आहे. जानेवारीमध्ये २७, २८ आणि २९ हे यात्रेचे मुख्य दिवस आहेत. त्यामुळे १३ जानेवारी ते १३ फेब्रुवारी असा संपूर्ण एक मास दर्शनासाठी देऊळ बंद असणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. यात्रेतील धार्मिक विधी, पूजा-अर्चा हे सर्व रूढी, प्रथा-परंपरेनुसार पार पडतील. यामध्ये स्थानिक पातळीवरील देवस्थानचे विश्वस्त, मंदिर पुजारी आणि ग्रामस्थ अशा मोजक्याच भाविकांना सहभागी होण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.