कॉकरोच जनता पार्टी’चे अध्यक्ष अभिजित दीपके यांच्यावर जंतर मंतर येथील आंदोलनात बरखा त्रेहान नावाच्या हिंदु महिलेने शाई फेकली. त्या महिलेच्या धर्माचा उल्लेख येथे करण्याचे कारण, म्हणजे त्या महिलेने स्वत:ची ओळख ‘कट्टर हिंदु धर्माभिमानी’ म्हणून सांगितली आहे. प्रभु श्रीरामाचा अवमान आंदोलनाच्या स्थळी होत असतांना दीपके हसत होते, त्याचा निषेध म्हणून ही कृती केल्याचे बरखा यांनी सांगितले आहे. बरखा त्रेहान यांनी ‘केलेल्या या कृतीचा मला अभिमानच आहे’, असे म्हटले आहे. याविषयी दीपके यांनी ‘एक्स’वर ‘माझा रंग निळा आहे, जय भीम’, असे लिहिले आहे. त्रेहान यांनी ‘अभिजितच्या गुंडांनी त्यांना पुष्कळ मारहाण केली. केवळ देहली पोलिसांमुळेच वाचले असून ‘नीट’ परीक्षा आणि हे आंदोलन यांचा काहीही संबंध नसून हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे’, असे सांगितले. नुकतेच आंदोलनस्थळी एकल विनोदी कलाकार कुणाल कामरा यांनी हिंदूंचे आराध्यदैवत प्रभु श्रीराम आणि सीतामाता यांच्याविषयी वक्तव्य करून अवमान केला. या व्यतिरिक्त ‘अल्लाचा गौरव करणारे आणि मूर्तीपूजा बंद होईल’, अशा आशयाचे गाणे गायल्यामुळे आंदोलन हे हिंदुविरोधी व्यासपीठ बनले आहे, हे लक्षात येते. कामरा यांच्या या कृतीच्या विरोधात आता जागृत हिंदु धर्माभिमानी निषेध नोंदवत आहेत. देहली येथे सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्त्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या नेतृत्वात संसद मार्ग पोलीस ठाण्यात, तर पुणे येथेही एका धर्माभिमानी अधिवक्त्याने तक्रार प्रविष्ट केली आहे. काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलनाच्या जवळ प्रतिआंदोलन केले आहे. आंदोलनस्थळी जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील साम्यवादी विचारसरणीचे विद्यार्थी नेते महागड्या गाड्यांमधून दुपारी येऊन रात्री पुन्हा निघून जात आहेत. परिणामी या ‘उपोषण’ आंदोलनाचे हसे होत आहे.
वांगचुक यांच्यानंतर कुणी नाही !
भारतविरोधी मानसिकता असलेले लडाख येथील सोनम वांगचुक यांची ‘आमरण उपोषण’ करतांना प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना देहली पोलिसांनी बळे बळे उचलून रुग्णालयात भरती केले. मुख्य म्हणजे याविषयी देहली पोलिसांनी ‘वांगचुक यांनीच विनंती केल्यामुळे असे केले’, असे सांगितले. याविषयी आंदोलनाचे आयोजक दीपके रडतांना दिसत होते. काल परवापर्यंत वांगचुक यांची शारीरिक स्थिती खालावत असतांना सरकार काहीच करत नाही म्हणून दीपके सरकारवर टीका करत होते. आज वांगचुक यांना उचलून नेल्यावर मात्र ‘वांगचुक यांना रुग्णालयात नेण्याची आवश्यकता नव्हती. त्यांची प्रकृती चांगली होती. सरकार आंदोलन दडपत आहे’, वगैरे रडगाणे चालू केले आहे. आता गंमत अशी की, वांगचुक यांच्या खांद्यावर आंदोलनाची धुरा सोपवून सर्व ‘कॉकरोच’चे कार्यकर्ते हे मस्त खात-पित, नाचत आणि गात उपोषण ‘साजरे’ करत होते. आता ज्याच्या जिवावर उपोषणाद्वारे सरकारला वेठीस धरून मागण्या मान्य करायच्या आहेत, त्यांनाच उचलून नेल्यावर उपोषणाचे कसे होणार, हा प्रश्न बहुधा ‘कॉकरोच जनता पार्टी’ला सतावत असणार म्हणून प्रथम दीपके स्वत: उपोषणाला बसले. दीपके यांना उपोषण झेपेना म्हणून साम्यवादी विद्यार्थी संघटनांच्या नेत्यांना तेथे बोलावण्यात आले. त्यांचीही पार्श्वभूमी ब्राह्मणविरोधी आणि हिंदुविरोधी अशीच आहे. ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’च्या नेहा बोरा नावाच्या विद्यार्थिनीने ‘अनेक दिवसांपासून आमरण उपोषण करत आहे’, असा आविर्भाव आणत स्वत:साठी चाकांची खुर्ची मागवून त्यात बसून फिरणे, इतरांना खांदा देण्यास सांगणे असे प्रकार करत आहे. दुपारी १२ ते रात्री १० असे प्रतिदिन आमरण उपोषण करणार्यांची सामाजिक माध्यमे अन् प्रसारमाध्यमे यांवर ‘टर’ उडवली गेली नाही म्हणजे नवलच ! ‘यांच्या चेहर्यावरून हे उपोषण करत असतील असे वाटते का ?’, असा प्रश्न सामाजिक माध्यमांवर विचारला जात आहे.
एक व्यक्ती तर साधू बनून या आंदोलनात सहभागी झाली, तेव्हा तेथे उपस्थित एका ‘यू ट्यूबर’ने ‘तुम्हाला गायत्री मंत्र येतो का ?’, असे विचारल्यावर साधू बनलेल्या या व्यक्तीने चक्क पळ काढल्याचे व्हिडिओत दिसते. यातून हिंदु साधूंचाही आंदोलनाला पाठिंबा आहे, असे त्यांना दाखवायचे होते. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या एका कार्यकर्तीने तर चक्क ‘देशाचे पंतप्रधान मुसलमान होते (?) तेव्हा देशात कोणतीच अडचण नव्हती. आता मोदी यांच्यामुळे देशात अडचणी निर्माण होत आहेत’, असे मुसलमानप्रेमी आणि मोदीविरोधी वक्तव्य केले आहे. अन्य एका व्हिडिओमध्ये ‘श्रीरामाचा काय अवमान केला ?’, असे विचारत साम्यवादी विचारसरणीची कार्यकर्ती उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या अंगावर धावून जात प्रश्न विचारतांना दिसत आहे. एक कार्यकर्ती तर प्रसारमाध्यमांसमोर मोदी, योगगुरु रामदेवबाबा यांना अत्यंत घाणेरड्या शिव्या घालतांना दिसत आहे. यामुळे गत २१ दिवसांपासून चालू असलेल्या या आंदोलनाविषयी देहलीकरांना विचारल्यावर कुणीही आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सिद्ध नाही. काही प्रमाणात वांगचुक यांच्याविषयी त्यांना आत्मीयता वाटत होती; मात्र आंदोलनाच्या नावावर केवळ हिंदुद्वेष, मोदीद्वेष आणि अल्लाचे गुणगान चालू असल्यामुळे लोकांनाही आंदोलन नकोच आहे.
कलम ३७० ची देशविरोधी मागणी !
आणखी एक धक्कादायक, म्हणजे जम्मू-काश्मीरमधील एका खासदाराने कलम ३७० पुन्हा लागू करण्याची देशविरोधी मागणी केली आहे. ‘कॉकरोच’चे उपस्थित कार्यकर्ते त्यांच्या या मागणीला पाठिंबा देतांना दिसतात. एकूणच जंतर मंतरवर कोणते आंदोलन चालू आहे ? यातून येथे कोणते वातावरण आणि कोणते लोक येत आहेत ? देशातील एकाहून एक घातक देशविरोधी मानसिकता असलेली व्यक्तीमत्त्वे आणि ज्यांना कुणी विचारत नाही, अशा लोकांचा एक बाजारच भरला आहे का ? अशा लोकांसाठीच हे आंदोलनाचे व्यासपीठ उभारले आहे का ? ‘केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे त्यागपत्र, ‘नीट’ परीक्षा योग्य पद्धतीने व्हावी’, या मागण्याही आता मागे पडत आहेत. स्वत: दीपके यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या सहकार्यांसमवेत आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांचीच टर उडवतांना सांगितले, ‘‘हे मी उठल्यावर घोषणा देण्यास प्रारंभ करतात आणि मला तोंडही धुवू देत नाहीत आणि अन्य कृतीही करू देत नाही.’’ दीपके यांच्या लेखीच या आंदोलनकर्त्यांची ‘किंमत’ काय आहे, हे दिसून येते. असे ‘विदुषकी’ आंदोलक आणि त्यांचे असे नेते असतील, तर आंदोलनाला कधी दिशा मिळणार आहे का ? आंदोलनाची आता दशा झाली असून देहली सरकारने आंदोलन गुंडाळण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. देशाच्या राजधानीत चाललेली ही ‘हास्यजत्रा’ आता पुरे करणे आवश्यक आहे. लोकशाहीतील अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अपलाभ घेत हिंदूंची श्रद्धास्थाने अन् राष्ट्रपुरुष यांच्यावर चिखलफेक करणार्यांना वठणीवर न आणल्यास त्यांच्या मर्कटचेष्टांनी देशभरासह जगात देहलीची आणि भारताची नाचक्की होण्याची वेळ येईल !



‘कॉकरोच जनता पार्टी’चा संसदेवर जाणारा मोर्चा हिंसक : पोलिसांनी लाठीमार करून पांगवले
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवरील दडपशाहीविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त !
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !