मुंबई येथे गोळी झाडून तरुणीची हत्या केल्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून युवकाची आत्महत्या

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – मालाडमधील इन्फिनिटी मॉलच्या येथे ४ जानेवारीच्या रात्री ९.३० वाजता २६ वर्षीय युवकाने एका तरुणीच्या डोक्यात गोळी मारून तिची हत्या केली. त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली. या दोघांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मृत युवकाचे नाव राहुल यादव, तर युवतीचे नाव निधी मिश्रा असे आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दूरभाष करून या घटनेची माहिती दिली. गोळी लागलेल्या युवक-युवतीला कांदिवली पश्‍चिम येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले; मात्र त्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.