१. ‘एस्.एस्.आर्.एफ्. फेसबूक’ (इंग्रजी)
१ अ. संशोधनावरील लेख वाचून प्रभावित होणार्या कु. सिल्वीया जी यू ! : ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संशोधन गटाने ‘आहार, पोशाख, केशरचना, प्रार्थना आणि मंत्रजप इत्यादींचा व्यक्तीवर होणारा आध्यात्मिक परिणाम’ या विषयावर केलेले संशोधन वाचून मी पुष्कळ प्रभावित झाले आहे. नुकताच मी ‘सौंदर्यप्रसाधन (मेकअप) आणि त्याचे होणारे आध्यात्मिक परिणाम’ या विषयावरील लेख वाचला आणि तो मला पुष्कळ माहितीपूर्ण वाटला.’ – कु. सिल्वीया जी यू
२. इन्स्टाग्राम
२ अ. साधना करून ‘संत’ बनण्याची इच्छा व्यक्त करणारे श्री. कार्लोस ब्रिटानिया ! : ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या या पानाने माझे संपूर्ण जीवन पालटून टाकले आहे. मला माझ्या पुढील जीवनात साधना करून संत बनण्याची इच्छा आहे. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी गांभीर्याने प्रयत्न करणार आहे. भविष्यात ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संशोधन केंद्राला भेट देण्याचा माझा मानस आहे.’ – श्री. कार्लोस ब्रिटानिया
३. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ अब्रॉड लॉग-इन
३ अ. आध्यात्मिक उपाय आणि नामजप यांमुळे हलकेपणा अनुभवणारे डॉ. डेव्हीड ओकोन्कवो ! : ‘मी चार दिवस नियमितपणे मीठ-पाण्याचे उपाय आणि माझ्या पंथानुसार नामजप केल्यावर मला पुष्कळ आनंदी आणि हलके वाटले. माझ्या मनातील नकारात्मक आणि अनावश्यक विचार नष्ट झाले आहेत, तसेच माझ्या मनातील सर्व गोंधळ संपल्याने माझे मन स्वच्छ झाले आहे. माझ्यातील हा पालट निश्चितच महत्त्वाचा आहे.’ – डॉ. डेव्हीड ओकोन्कवो, अमेरिका
३ आ. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’मुळे अध्यात्म आणि ईश्वर यांवर विश्वास बसल्याचा अनुभव घेणारे श्री. मॅन्युअल स्टीगेर ! : ‘एस्.एस्.आर्.एफ्.’मुळे मला पुष्कळ साहाय्य झाले आहे. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’मुळेच माझा अध्यात्म आणि ईश्वर यांवर विश्वास बसला. मी ज्या वेळी नामजप करायचो, त्या वेळी सर्व काही सुरळीत आणि चांगले चालले होते.’ – श्री. मॅन्युअल स्टीगेर, स्वित्झर्लंड
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |