झारखंड येथे प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीचे लैंगिक शोषण करणार्‍या धर्मांधाला अटक

अशांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

गवा (झारखंड) – येथील मेराल गावामध्ये रहाणार्‍या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अहमद अन्सारी याने विवाह करण्याचे आमीष दाखवून तिचे २ वर्षे लैंगिक शोषण केले. त्यामुळे ती गर्भवती झाली. त्यावर त्याने विवाह करण्यास नकार दिला. जेव्हा ही मुलगी त्याला भेटण्यासाठी त्याच्या गावी गेली, तेव्हा त्याने पुन्हा तिचे लैंगिक शोषण केले.

त्यामुळे तिची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आल्यावर अहमद अन्सारी याला अटक करण्यात आली आहे.