अॅलोपॅथी आणि होमिओपॅथी ही औषधे तीन मास घेऊनही न थांबणारा कोरडा खोकला आयुर्वेदीय औषधांनी केवळ २० दिवसांत पूर्णपणे नाहीसा होणे
‘जून २०१२ पासून मला कोरडा खोकला येऊ लागला. सतत ढास येऊन खोकला यायचा. कोरडा खोकला असल्याने पुष्कळ प्रयत्न करूनही कफ बाहेर पडत नव्हता. रात्री खोकल्याचा जोर वाढायचा. त्यामुळे झोपही येत नव्हती. खोकून-खोकून बरगड्या दुखायच्या. तीन मास (महिने) प्रथम अॅलोपॅथी आणि नंतर होमिओपॅथीची औषधे घेऊनही खोकला थांबत नव्हता. सतत ढास लागायची. ऑक्टोबर २०१२ मध्ये आश्रमात आलेल्या आयुर्वेदिक वैद्यांनी मला कंटकारी अवलेह, तालिसादी चूर्ण आणि कनकासव ही औषधे दिवसातून दोन वेळा घेण्यास सांगितले. त्यानुसार मी ही औषधे न चुकता २० दिवस घेतली. त्यासह सकाळी आणि रात्री पाण्यात मीठ घालून गुळण्या करणे, दुधात हळद घालून घेणे, हेही उपचार केले. (या गोष्टी आधीही करत होतो.) शेवटी आयुर्वेदिक औषधांमुळे माझा खोकला पूर्णपणे नाहीसा झाला.’ – श्री. माधव गाडगीळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल.