राजाने बुद्धी शुद्धी करण्यासाठी आयुर्वेदाचार्यांच्या संगतीत रहावे !

चरकाचार्यांनी सांगितले आहे, ‘‘प्रत्येक राजाने आपल्या राजवाड्यात वैद्याला आश्रय द्यावा आणि राजाने ज्या ज्या वेळेस त्याला वेळेची अनुकूलता असेल, त्या त्या वेळेस विषयभोगामुळे ढगाळलेली बुद्धी शुद्ध होण्यासाठी त्याच्या संगतीत रहावे.’’ त्यामुळे आयुर्वेदाच्या अभ्यासावरून आपण अशा विचारधारेवर येतो की, भावी काळात प्रत्येक मंत्री हा आयुर्वेदाचार्य असलाच पाहिजे; कारण राजा, राष्ट्र आणि समाज यांचे आरोग्य त्यांच्या संगानेच स्वस्थ रहाते.