कोरोना प्रतिबंधक काढा

आयुष मंत्रालयाने पुढील कोरोना प्रतिबंधंक काढा पिण्याचा सल्ला दिला आहे. काढ्याच्या प्रमाणात एकूण सामुग्रीपटीत चार भाग तुळशीची पाने, दोन भाग दालचिनी, दोन भाग सुंठ आणि एक भाग काळे मिरे घ्या. हे सर्व एकत्र वाटून त्याची पावडर बनवा. त्याच्यापासून ३ ग्रॅमची ‘टी-बॅग’ किंवा ५०० मिलिग्रॅम पावडरच्या गोळ्या सिद्ध किरा. दिवसातून एक किंवा दोन वेळा याला १५० मिलिलिटर उकळलेल्या पाण्यात घालून चहासारखे प्या. (संदर्भ : संकेतस्थळ)

आयुष मंत्रालयाने सांगितलेले कोरोना प्रतिबंधक आयुर्वेदिक उपाय !

  • संपूर्ण दिवसभरात ज्या-ज्या वेळी पाणी प्याल, त्या वेळी कोमट पाणी प्यावे.

  • दररोज दिवसांतून न्यूनतम ३० मिनिटे तरी योगासने, प्राणायाम, ध्यान-धारणा आवश्यक करावी.

  • हळद, जिरे, धने, लसूण या पदार्थांचा जेवणात समावेश करा.

  • हर्बल टी किंवा काढा प्यावा.

  • प्रतिदिन एक चमचा च्यवनप्राश खाऊन दिवसाचा आरंभ करा.

  • तुळस, दालचिनी, काळी मिरी, आले, मनुका पाण्यात एकत्र उकळवून आणि गाळून हा काढा सिद्ध करून प्यावा.

  • हळद घातलेले दूध प्यावे.

  • तिळाचे किंवा खोबरेल तेल अथवा देशी तुपाचे दोन थेंब नाकपुड्यांमध्ये टाका.

देशातील आयुर्वेदाचार्यांकडून ही माहिती देण्यात आली आहे. प्रत्येकाने आपली गरज आणि सोय याप्रमाणे याचा उपयोग करावा. बदलत्या हवामानामुळे होणार्‍या समस्यांशी लढण्यासाठी हे उपाय लाभकारक ठरू शकतात.