त्वचा हा निसर्गाने शरिराला दिलेला पोषाख आहे. धूळ, वारा, उष्णता, थंडी, जंतू, वैश्विक किरण(Cosmic Rays) इत्यादी बाह्य गोष्टींपासून संरक्षण करणे, सुखद किंवा दुःखद स्पर्श, उष्ण-शीत यांचे स्पर्श ज्ञान होणे, घामावाटे शरिराचे योग्य तापमान राखणे आणि शरिराला आवश्यक असलेले ‘डी’ जीवनसत्त्व निर्माण करणे अशी विविध कार्ये त्वचा करते. त्वचेचा मनाशी घनिष्ठ संबंध असतो. रागावलेला मनुष्य लालबुंद होतो, तर घाबरलेला मनुष्य पांढराफटक पडतो. सतत काळजी केल्यामुळेही त्वचारोग होतात.
‘पूर्वजन्मी घडलेले पाप’, हे त्वचाविकारांच्या अनेक कारणांपैकी एक कारण आहे. त्याच्या निवारणासाठी दैवी उपचार करावेत, असे आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथांत सांगितलेले आहे. सर्वांनीच त्या उपचारांचा अवलंब करायला हवा !