‘एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा साधकांना सत्संग लाभला. त्यातील सूत्रे येथे दिली आहेत.

१. पूर्वीच्या युगात आई-वडील मुलांच्या साधनेला साहाय्य करत, तर कलियुगात ते साधनेला विरोध करतात !
एक साधिका : ‘नमस्कार गुरुदेव, माझ्या बाबांचा साधनेला थोडा विरोध आहे. त्यामुळे मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येतांना पुष्कळ अडचणी येत होत्या.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : कलियुगात कसे असते पहा. पूर्वीच्या युगांत मुलगा किंवा मुलगी साधना करत असेल, तर आई-वडिलांना आनंद होत असे. आजकाल मात्र आई-वडीलच मुलांच्या साधनेला विरोध करतात. त्या वेळी तू त्यांच्या विरोधाला कशी सामोरी जातेस?
२. साधना चांगली असेल, तर ईश्वर प्रत्येक अडचण दूर करतो !
एक साधिका : ‘आपणच ही अडचण दूर करावी’, अशी मी आपल्याला प्रार्थना करते. तेव्हा आपण माझी अडचण दूर करता. गुरुदेव, ‘मला एखादी अडचण आली, तर मी माझ्या डोळ्यांसमोर आपला चेहरा आणते आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्मातून दर्शन घेऊन आपल्याला ती अडचण सांगते. तेव्हा आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे ती अडचण दूर करता’, अशी मला अनुभूती येते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तुझी साधना एवढी चांगली आहे की, ईश्वर तुझी प्रत्येक अडचण दूर करतो.
३. सहस्रो लोक प्रार्थना करतात; मात्र ईश्वर साधना करणार्या व्यक्तीलाच आशीर्वाद देतो !
एक साधिका : मला कधी कसलीही अडचण येत असेल, तर मी आपला आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा चेहरा डोळ्यांसमोर ठेवून प्रार्थना करते. तेव्हा आपण ती अडचण त्वरित दूर करता. एकदा माझ्या गालावर लहान फोड आला होता. त्यामुळे माझ्या गालाला सूज आली होती. ‘तो फोड शस्त्रकर्म करून काढायचा आहे’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले. तेव्हा मला फार भीती वाटत होती. तेव्हा ‘मी आधुनिक वैद्यांच्या चेहर्याच्या ठिकाणी तुमचा चेहरा आहे’, असा भाव ठेवून प्रार्थना करू लागले. तेव्हा आधुनिक वैद्यांनी तेथे केवळ लहान सुई किंचित लावली आणि माझ्या गालावरील फोड पूर्ण बरा झाला.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ईश्वर कुणावर कृपा करतो ? सहस्रो लोक प्रार्थना करतात; परंतु ईश्वर कुणाचे ऐकतो ? ‘ज्याच्यामध्ये तुझ्यासारखा भाव आहे आणि ज्याला साधना करायची आहे’, त्यालाच ईश्वर आशीर्वाद देतो. फारच छान ! हे लक्षात ठेवा. आपली साधना वाढवली, तरच ईश्वर साहाय्य करतो.
४. ईश्वराला शरण गेल्यास तो प्रत्येक अडचणीत साधकाला साहाय्य करतो !
एक साधिका : गुरुदेवा, आपण मला कोणत्याही अडचणीत कधीही एकटे सोडले नाही. प्रत्येक अडचणीत आपण सूक्ष्मातून माझ्या समवेत होतात. त्यामुळे माझ्या घरातील वातावरणात सकारात्मक पालट झाला आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तुम्ही ईश्वराला शरण गेला आहात. त्यामुळे ईश्वर तुम्हाला एवढे साहाय्य करत आहे.’
आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
संतांचा कार्यकर्त्यांना संदेश
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात पुणे येथील शास्त्रीय गायक पंडित डॉ. संजय गरूड यांनी सादर केली गायनसेवा !
गुरुस्तवन भावांजली