पैशापेक्षा भगवंतावर श्रद्धा ठेवणे श्रेष्ठ !

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

 धनाची आसक्ती असलेल्या व्यक्तीचे विचार ! : ‘ज्याची भगवंतावर श्रद्धा असते, त्याचा पैशावर विश्वास नसतो. मूर्ख ‘पैशाविना कसे जगू ?’, असा टाहो फोडतो. त्याला पैशाचा भरवसा वाटतो. भगवंताचा नाही. त्याला वाटते, ‘भगवंताविना जगता येते; पण पैशाविना जगणे अशक्य !’ त्याला जीवेषणा अत्युत्कट असते.

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साभार : मासिक ‘घनगर्जित’, १ डिसेंबर २०२१)