‘१०.७.२०२६ या दिवशी ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’चा १४ वा वर्धापनदिन झाला. त्या निमित्ताने हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अंतर्गत सेवा करणार्या अधिवक्त्यांना हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, अंबरनाथ, जिल्हा ठाणे.

१ अ. साधिकेला गुणवृद्धी करण्याचे ध्येय घेण्यास सांगणे : ‘पूर्वीपासून माझा स्वभाव पुष्कळ भित्रा होता, तसेच माझ्यात अभ्यासू वृत्ती आणि एकाग्रता यांचा अभाव हे तीव्र स्वभावदोष होते. माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांच्या विचारांमुळे ‘मी हिंदु विधीज्ञ परिषदे’च्या अंतर्गत सेवा करू शकेन कि नाही ?’, अशी माझी स्थिती होती. माझी ही स्थिती अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मला सांगितले, ‘‘आपण जी सेवा करतो, त्यासाठी आवश्यक असणारे गुण स्वतःमध्ये वाढवले पाहिजेत, तरच सेवेची फलनिष्पत्ती चांगली मिळते.’’ त्यांनी मला या सूत्राची जाणीव करून देऊन न्यायालयीन कामकाजाच्या अनुषंगाने निर्भयता, एकाग्रता, अभ्यास वृत्ती आणि चिकाटी हे गुण प्राधान्याने वाढवण्याचे ध्येय घेण्यास सांगितले. त्यानुसार गुण वाढवण्याचे ध्येय निश्चित करून मी प्रयत्न केले. यात मला सहसाधकांचेही पुष्कळ साहाय्य मिळत आहे. त्यामुळे मला देवाच्या कृपेने सेवा परिणामकारक होण्यासाठी लाभ होत आहे.’
२. अधिवक्त्या (कु.) दिव्या शिंत्रे, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.
२ अ. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : ‘वीरेंद्रदादा दिवसभर व्यस्त असतात. त्यांच्याकडे सलग सूत्रे येत असतात. वीरेंद्रदादा सेवेत कितीही व्यस्त असले, तरी त्यांना नामजप करण्याची पुष्कळ तळमळ आहे. ते त्यांच्या व्यस्त नियोजनातूनही नामजप आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यासाठी वेळ काढतात. आम्ही सर्व जण एकत्र सेवा करत असतांना दादा सर्वांना एकत्र घेऊन उपायांनाही बसतात. त्यानंतर सेवेची गुणवत्तासुद्धा वाढते. कधी कधी मला ‘माझी चूक झाली आहे’ हे सांगण्यासाठी माझा ‘प्रतिमा जपणे’ हा स्वभावदोष आड येतो; मात्र वीरेंद्रदादांकडून छोटीसी चूक झाली, तरी ते लगेच क्षमा मागतात.

२ आ. सेवा करतांना सतत ईश्वराच्या अनुसंधानात असणे : दादा ज्या वेळी सेवा करत असतात, त्या वेळी ते ‘सतत अनुसंधानात आहेत आणि ते देवाला विचारून सेवा करत आहेत’, असे मला जाणवते. त्यांना सेवेच्या संदर्भात नाविन्यपूर्ण आणि फलनिष्पत्ती मिळणार्या कल्पना सुचत असतात. त्यांनी युक्तीवाद करण्यासाठी जी सिद्धता केलेली असते, त्यापेक्षा प्रत्यक्ष युक्तीवाद करतांना ते अधिक उत्तम करतात. तेव्हा ‘देवाच्या कृपेमुळेच सर्व सुचले’, असा त्यांचा भाव असतो. त्यामुळे काही वेळा न्यायाधीशही दादांचे कौतुक करतात.
२ इ. कर्तेपणा न घेणे : दादांनी न्यायालयात किंवा विविध कार्यक्रमांत आणि ‘पॉडकास्ट’मध्ये (ध्वनीचित्र स्वरूपातील कार्यक्रमामध्ये) चांगल्या पद्धतीने विषय मांडल्यानंतर विविध अधिवक्ते अन् समाजातील लोक दादांचे कौतुक करतात; मात्र ते कधीही याचे श्रेय स्वतःकडे घेत नाहीत. ‘हे सर्व देवाचे आहे आणि मला देव सुचवतो; म्हणून हे साध्य होते’, असा त्यांचा भाव असतो. ते सतत शरणागतभावात असतात. ते मला नेहमी सांगतात, ‘‘ज्या वेळी आपले कौतुक होते, त्या वेळी आपले मन सुखावते आणि आपण तिथेच थांबतो. तेव्हा आपल्या मनात ‘कौतुकाचा विचार न करता अजून मी पुढे काय करायला पाहिजे ?’, असा विचार असायला हवा.’’
२ ई. स्वतःची साधना म्हणून निरपेक्षतेने धर्मप्रेमींना साहाय्य करणे : दादा बर्याच धर्मप्रेमींना ‘धर्मकार्य योग्य पद्धतीने व्हावे’, यासाठी काही वेगवेगळ्या योजना सांगत असतात. त्यानुसार कृती केल्याने मोठे यश मिळते; मात्र या सर्वांत ‘स्वतःचे नाव पुढे यावे’, अशी दादांची कधीच इच्छा नसते. ‘आपले नाव पुढे आले नाही, तरी चालेल; मात्र धर्मकार्य पुढे गेले पाहिजे’, अशी त्यांची इच्छा असते. दादांनी माझ्यासमोर कृतीतून आदर्श ठेवला आहे. दादांनी नियोजित केलेल्या बर्याच मोहिमा यशस्वी झाल्या आहेत आणि त्यांची चांगली फलनिष्पत्तीही मिळाली आहे.
२ उ. अनासक्त : वीरेंद्रदादांची आसक्ती अल्प आहे. न्यायालयात इतर अधिवक्ते महागडे भ्रमणभाष, आयपॅड (लहान भ्रमणसंगणक) इत्यादी घेऊन वावरत असतात; मात्र वीरेंद्रदादांचा ‘या गोष्टी माझ्याकडे हव्यातच’, असा अट्टाहास नसतो.
२ ऊ. नेतृत्व : ‘आदर्श आणि आध्यात्मिक नेतृत्व कसे असायला हवे ?’, याचे उत्तम उदाहरण म्हणजे वीरेंद्रदादा आहेत. स्वतःसह इतरांनाही पुढे घेऊन जाण्याची दादांची तळमळ असते. समाजातील लोकांसमोर साधक अधिवक्त्यांची ओळख करून देतांना ते साधक अधिवक्त्यांची गुणवैशिष्ट्ये सांगतात. वीरेंद्रदादांची इतरांना पारखण्याची क्षमता पुष्कळ आहे. न्यायालयीन कामे पुष्कळ तणावाची असतात. प्रत्येक अधिवक्त्याची शिकण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वेगवेगळी असते. ‘कोणाची किती क्षमता आहे ? कोणाला कशात आवड आहे ?’, याचे निरीक्षण दादा चांगल्या पद्धतीने करतात. समोरील साधकाला पारखून, त्याला ताण येऊ न देता, त्याची आवड, क्षमता आणि कौशल्य यांचा योग्य वापर करून ते त्याला सेवा देतात. त्यामुळे साधकांचा ताण न्यून होतो आणि त्यांना सेवेतील आनंदही घेता येतो. साधकांची न्यायालयीन सेवा करण्याची तळमळ आणि उत्साह वाढतो.
२ ए. साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना समजून घेऊन साहाय्य करणे : दादा सर्वांना समजून घेतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलतांना कोणाला ताण नसतो. दादांना एखाद्याने छोट्यात छोटी शंका जरी विचारली, तरी ते न कंटाळता शांतपणे आणि मनापासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात. दादा समोरच्याची अडचण समजून घेतात आणि त्यावर परिणामकारक उपाययोजना काढतात. त्यांना पुष्कळ सेवा असतात, अनेक ताणाचे प्रसंग घडत असतात; मात्र त्यांच्या चेहर्यावर ते कधीच दिसत नाही. ते नेहमी हसतमुख असतात. ‘मला स्वतःबद्दल न्यूनगंड आहे आणि स्वतःला न्यून लेखणे’, असे माझ्यात तीव्र स्वभावदोष आहेत. त्यामुळे मी सेवा करतांना कधी कधी आरंभीच ‘मला हे जमेल का ?’, असे स्वतःबद्दल नकारात्मक विचार माझ्या मनात येत असतात; मात्र दादा माझ्या मनातील विचार ओळखून मला छोट्या छोट्या सेवा देऊन माझ्या मनाची सिद्धता करून घेतात. त्यानंतर मला माझे गुण सांगून माझा आत्मविश्वास वाढवतात. दादा एकाच वेळी अनेक सेवा करत असतात; पण त्या सेवा चालू असतांना जर त्यांना अन्य कोणी एखादे सूत्र विचारले, तर ते शांततेने, स्थिरतेने आणि लक्षपूर्वक ऐकतात. धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना दादांचा पुष्कळ आधार वाटतो. ‘त्यांना हवे ते साहाय्य करणे, नवीन अधिवक्त्यांनी योग्य दिशेने कसे पुढे गेले पाहिजे ?’, याविषयी दादा मार्गदर्शन करतात.
२ ऐ. बर्याच वेळा न्यायालयात ‘वीरेंद्रदादांच्या जागी साक्षात् कृष्ण उभा आहे’, असे मला जाणवते.’
हिंदुत्वनिष्ठ आणि धर्माधिष्ठित अधिवक्त्यांची संघटना ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’च्या आद्याक्षरांचा अर्थ

हिं – हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढणारी
दु – दुष्प्रवृत्तीविरुद्ध लढणारी
वि – हिंदुत्व आणि धर्म यांच्या विविध विषयांसाठी न्यायालयीन लढा देणारी
धी – धीरोदात्तपणे हिंदूंना पाठिंबा देणारी
ज्ञ – ज्ञानमार्गाने सत्य जाणून घेऊन सेवा करून घेणारी
प – परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी न डगमनता लढणारी
रि – संघटित शक्तीमुळे विजयी होणारी
ष – षड्रिपूंवर मात करून ईश्वरी चरणांकडे नेणारी
द – देवाच्या आशीर्वादाने राष्ट्र आणि धर्म यांसाठी लढणारी
– अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी, दापोली, जिल्हा रत्नागिरी. (३.७.२०२६)
३. अधिवक्ता अनेश परळकर, मुंबई

३ अ. अभ्यासू आणि संशोधन वृत्ती : ‘अधिवक्ता वीरेंद्र यांच्याकडे ‘कोणत्याही प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याचा सखोल अभ्यास करणे’ हा गुण आहे. मध्यप्रदेशातील धार येथील भोजशाळेच्या प्रकरणात मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने हिंदु पक्षाच्या बाजूने निर्णय दिला. ‘आवश्यक कायदेशीर कागदपत्रे, दस्तावेज (न्यायालय पुरावा म्हणून मान्यता देते, अशी कागदपत्रे), नकाशे इत्यादी पुरातत्व विभागातून गोळा करणे, त्याचा सखोल अभ्यास करणे, त्या संबंधित सर्व सेवा करण्यासाठी अथक प्रयत्न करणे’ यांसाठी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी घंटो-न्-घंटे सरकारी कार्यालयात फेर्या मारून, तेथे थांबून प्रयत्न केले होते. त्यामुळेच अधिवक्त्यांना हिंदु पक्षाची बाजू मांडणे सहज सुलभ झाले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : ३.७.२०२६)
जपमाळ
समाजातील विशिष्ट पंथियांचे उपद्रवमूल्य आणि त्यामुळे होणारी हानी
साधकांनो, भविष्याची काळजी न करता स्वतःची साधना वाढवा !
साधिकेची मातृभाषा मराठी नसूनही तिला मराठी भाषेतील सात्त्विकतेची आलेली प्रचीती !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
उत्तरप्रदेश : ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्याला दोषीला २० वर्षांची शिक्षा