ठाणे येथे सडलेल्या अन्नसाठ्यावर अन्न आणि औषध प्रशासनाची धाड !

एआय निर्मित चित्र

ठाणे, ११ जुलै (वार्ता.) – नौपाडा येथील शिवानंद इमारतीत जीवनावश्यक वस्तू तसेच खाद्यपदार्थ यांची साठवण केलेल्या केंद्रावर अन्न आणि औषध प्रशासनाने (‘एफ्.डी.ए.’ने) धाड घालून कारवाई केली. तेथून ऑनलाईन पद्धतीने वस्तूंचा पुरवठा केला जात असे.

सडलेले दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड आणि अन्य खाद्यपदार्थ साठवून ठेवल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. यानंतर भाजप नगरसेवक संजय वाघुले आणि शिवसेनेचे पदाधिकारी किरण नाकती यांनी घटनास्थळी पहाणी करून कारवाईची मागणी केली. अन्वेषणात स्वच्छता आणि अन्नसाठवणूक यांत गंभीर त्रुटी आढळल्या. अन्नपदार्थ साठवण्याच्या कार्यपद्धतीत नियमभंग करणार्‍यांवर कठोर कारवाईची चेतावणी अन्न आणि औषध प्रशासनाने दिला आहे.

संपादकीय भूमिका

लोकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या केंद्रांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित !