
मुंबई – भारताची सहावी स्टेल्थ फ्रिगेट (शत्रूचे रडार, सोनार और इन्फ्रारेड सेंसर पकडले जाऊ शकतील असा युद्धस्रोत) ‘आय.एन्.एस्. महेंद्रगिरी (एफ् ३८)’ या युद्धनौकेचा ११ जुलै या दिवशी नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला. प्रकल्प ‘१७ अ’अंतर्गत निलगिरी श्रेणीतील ही ६ वी युद्धनौका आहे. विशाखापट्टणम् येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या वेळी नौदलाचे अधिकारी उपस्थित होते.
१. पूर्व घाटातील महेंद्रगिरी पर्वतरांगांच्या नावावरून नाव देण्यात आलेल्या या युद्धनौकेची रचना भारतीय नौदलाच्या ‘वॉरशिप डिझाइन ब्युरो’ने केली आहे. मुंबईतील ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड’ने तिची बांधणी केली आहे.
२. ही युद्धनौका अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि ‘सेन्सर्स’च्या संचाने सुसज्ज आहे. तसेच पृष्ठभागावरून पृष्ठभागावर आणि पृष्ठभागावरून हवेत मारा करणार्या क्षेपणास्त्रप्रणाली अन् इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमतांसह अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी ही युद्धनौका सुसज्ज आहे.
इस्माईलला मुसलमान समाजातून बहिष्कृत करावे ! – भाजप
कांदिवली येथे तरुणाकडून अल्पवयीन मुलीची हत्या !
पुण्यातील भ्रष्ट उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित
मुंबई उच्च न्यायालयाने सर्व आरोपींच्या केलेल्या निर्दाेष मुक्ततेच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार !
UDISE Plus Report : देशभरात प्रतिदिन सरासरी १३ शाळा होतात बंद !
आधी ‘वन्दे मातरम्’ नंतर ‘जन गण मन’ गायले किंवा लावले जाईल ! – केंद्रशासनाचा आदेश