साधकांनो, भविष्याची काळजी न करता स्वतःची साधना वाढवा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘वयोमानानुसार माझे समष्टीमधील कार्य कमी झाले आहे. त्यामुळे काही साधकांना ‘भविष्यात आपले कसे होणार ?’ 

किंवा ‘भविष्यात कार्याची दिशा कोण देणार ?’ यांसारखे काळजीचे विचार येतात. प्रत्यक्षात हे देवाचे कार्य आहे. ते होतच रहाणार आहे. यापुढेही साधक व्यष्टी स्तरावर साधना करून संत होतील. समष्टी स्तरावर राष्ट्र आणि धर्म यांसाठी साधना करण्याची दिशा देणारे संतही होतील. कार्य करण्यासाठी पुढच्या पुढच्या पिढ्याही तयार होतील. त्यामुळे त्याची काळजी करू नये. प्रथम स्वतः अधिकाधिक चांगले साधक होण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी मार्गदर्शन करणार्‍या साधकांची मदत घ्या.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले