आधी ‘वन्दे मातरम्’ नंतर ‘जन गण मन’ गायले किंवा लावले जाईल ! – केंद्रशासनाचा आदेश

नवी देहली –  ‘जन गण मन’ आणि ‘वन्दे मारतम्’ जर दोन्ही एकाच वेळी सादर केले गेले, तर आधी ‘वन्दे मातरम्’ आणि नंतर ‘जन गण मन’ लावले जाईल. ज्या राज्यांमध्ये राज्यगीतही आहे, तिथेही ठरलेल्या क्रमाने पालन करावे लागेल, असा आदेश केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना दिला. नियमांनुसार कोणत्या कार्यक्रमांमध्ये दोन्ही गीते गाणे किंवा वाजवणे आवश्यक आहे ?, हे आधीच ठरवले आहे, असे सरकारने म्हटले आहे.