
ठाणे, ११ जुलै (वार्ता.) – भिवंडी शहरातील गायत्रीनगर परिसरातील फातिमा नगर येथील न्यू आजमी कंपाऊंडमधील ‘यू.एस्. टेक्सटाईल’ हा यंत्रमाग कारखाना ११ जुलैला अचानक कोसळला. सुदैवाने त्या वेळी कामगारांची जेवणाची वेळ असल्याने मोठी जीवितहानी टळली. या दुर्घटनेत २ कामगार किरकोळ घायाळ झाले आहेत. संबंधित कारखान्याला महानगरपालिकेने यापूर्वीच धोकादायक इमारत म्हणून नोटीस बजावली होती. तरीही कारखाना चालू होता. परिसरातील अनधिकृत आणि धोकादायक असल्याची नोटीस बजावलेल्या कारखान्यांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न नागरिक विचारला आहेत.
मुख्यमंत्र्यांनी घेतले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन !
कांदिवली येथे तरुणाकडून अल्पवयीन मुलीची हत्या !
पुण्यातील भ्रष्ट उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित
‘लव्ह जिहाद’ आणि हिंदु तरुणीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्याच्या प्रकरणी ग्रामस्थांचा कागल (जिल्हा कोल्हापूर) पोलीस ठाण्यावर मोर्चा !
जुन्या कसारा घाटात संरक्षण भिंत कोसळली
ठाणे येथे सडलेल्या अन्नसाठ्यावर अन्न आणि औषध प्रशासनाची धाड !