टीईटी पेपरफुटी प्रकरणी आणखी २ आरोपी न्यायालयीन कोठडीत !

मुख्य सूत्रधार अद्याप पसार

ठाणे, ११ जुलै (वार्ता.) – शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणातील पोलीस कोठडीत असलेल्या कपिल दहिया आणि संजयकुमार शर्मा या २ आरोपींना ११ जुलैला भिवंडी न्यायालयात उपस्थित करण्यात आले. न्यायालयाने दोघांना २४ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी १० जण न्यायालयीन कोठडीत आहेत, तर २ आरोपी पोलीस कोठडीत आहेत. या पेपरफुटी प्रकरणातील २ मुख्य आरोपी अद्याप पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.