मुख्यमंत्र्यांनी घेतले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन !

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करतांना विश्वस्त

पुणे – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठ येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याला भेट देऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी’च्या विश्वस्तांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. दर्शनानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थित वारकरी बांधवांशी संवाद साधला.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतांना मुख्यमंत्री