पाकिस्तानी आतंकवादी संघटना ‘हिजबुल मुजाहिदीन’चा उपप्रमुख कमांडर शमशेर खान याची स्वीकृती !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमधून पाठवलेले आतंकवादी काश्मीरमध्ये बर्याच काळापासून सक्रीय आहेत. पाकिस्तानी आतंकवादी काश्मीरमध्ये केवळ ‘लढत’ नाहीत, तर त्यांच्या कबरी प्रत्येक शहरात अस्तित्वात आहेत. काश्मीरमधील लोलाब, कुपवाडापासून ते कठुआपर्यंत प्रत्येक शहरात पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या कबरी आहेत. काश्मीरमध्ये असे कोणतेही कब्रस्तान (स्मशानभूमी) नाही, जिथे एखाद्या पाकिस्तान्याचे दफन केलेले नाही, अशी स्वीकृती पाकिस्तानी आतंकवादी संघटना ‘हिजबुल मुजाहिदीन’चा उपप्रमुख कमांडर शमशेर खान याने दिली. त्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. त्यात त्याने ही स्वीकृती दिली. त्याच्या या स्वीकृतीमुळे काश्मीरमध्ये आतंकवादाला पाकिस्तान खतपाणी घालत आहे, हे पुन्हा उघड झाले.
🚨 Pakistan's Role in Cross-Border Terrorism Laid Bare: Hizbul Commander Admits Pakistani Terrorists Are Buried Across Kashmir
Shamsher Khan, Deputy Chief Commander of Hizbul Mujahideen, has admitted that graveyards across Kashmir contain the graves of Pakistani terrorists.… pic.twitter.com/uV3vuc32Ec
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 11, 2026
शमशेरचा हा व्हिडिओ ८ जुलैचा असल्याचे सांगितले जात आहे. तो पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये ‘जमात-ए-इस्लामी’च्या एका कार्यक्रमात बोलत होता. तो म्हणाला की, काश्मीरचे पाकिस्तानशी एक नाते असून ते कुणीही तोडू शकत नाही.
शमशेरचा हा व्हिडिओ अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा पाकव्याप्त काश्मीरचे लोक पाकिस्तानी सैन्य आणि सरकार यांच्याविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत. येथे लोक ‘जॉईंट अवामी ॲक्शन कमिटी’च्या नेतृत्वाखाली निदर्शने करत आहेत. शमशेर खान याने या कमिटीवर टीका करत पाकिस्तानशी विश्वासघात केल्याचा आणि भारताच्या हितासाठी काम करत असल्याचा आरोप केला आहे.
हस्तक्षेप आणि विध्वंस यांच्या माध्यमातून विश्वासार्हता गमावलेले साम्राज्य म्हणजे अमेरिका !
मुंबई उच्च न्यायालयाने सर्व आरोपींच्या केलेल्या निर्दाेष मुक्ततेच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार !
आमचा आणि भारताचा डी.एन्.ए. एकच ! – Afghanistan Minister Mawlawi Attaullah Omari
भारतातून चोरलेल्या ३ प्राचीन मूर्ती ऑस्ट्रेलिया सरकार भारताला परत करणार !
Racism In Australia : ऑस्ट्रेलियात काम करणार्या भारतीय ट्रकचालकांच्या विरोधात होत आहे वर्णद्वेष !
Vietnam Boat Tragedy : व्हिएतनाममधील समुद्रात नौका उलटून भारतीय पर्यटकांसह १५ जणांचा मृत्यू