भारतातून चोरलेल्या ३ प्राचीन मूर्ती ऑस्ट्रेलिया सरकार भारताला परत करणार !

सिडनी (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलिया भारताला त्याच्या सांस्कृतिक वारशाशी संबंधित ३ अत्यंत महत्त्वाच्या प्राचीन मूर्ती परत करणार आहे. यामध्ये कांस्य धातूचा त्रिशूळ अन् त्यावर श्री भद्रकालीदेवीची मूर्ती, ग्रॅनाइट दगडापासून बनवलेली नंदीची मूर्ती अन् काळ्या दगडावर कोरलेली ६ मुखे असलेल्या भगवान कार्तिकेयांची दुर्मिळ मूर्ती, यांचा समावेश आहे. या सर्व प्राचीन कलाकृती अनेक वर्षांपूर्वी तामिळनाडूतील जुन्या मंदिरांमधून चोरूद बाहेर नेल्या गेल्या होत्या. हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यानंतर ऑस्ट्रेलिया सरकारने घेतला आहे.

१. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार या कलाकृतींचा संबंध ११ व्या आणि १२ व्या शतकाशी आहे आणि या भारताच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहेत.

(चित्रावर क्लिक करा)

२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अमूल्य प्राचीन कलाकृती भारताला परत करण्याच्या निर्णयाविषयी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांचे आभार मानले.

३. सध्या या तिन्ही कलाकृती ऑस्ट्रेलियाच्या ‘नॅशनल गॅलरी ऑफ ऑस्ट्रेलिया’मध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.