सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथील पोलीस ठाण्यात गोहत्या करणारे ४७ मुसलमान आरोपी स्वतःहून पोचले !
सहारनपूर (उत्तरप्रदेश) – गोहत्येच्या गुन्ह्यांमध्ये पूर्वी संशयित राहिलेले ४७ मुसलमान आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात पोचले आणि त्यांनी भविष्यात गुन्हेगारी जगतापासून पूर्णपणे दूर रहाण्याचे आश्वासन दिले. ज्यांच्यावर गँगस्टर कायद्यांतर्गत कारवाई झाली आहे, अशा आरोपींचाही यामध्ये समावेश होता. पोलीस ठाण्यात पोचलेल्या या सर्व लोकांच्या हातात संदेश लिहिलेल्या पाट्या होत्या. या पाट्यांवर कायद्याचा आदर करणे, गुन्हेगारीपासून दूर रहाणे आणि प्रामाणिकपणे जीवन जगणे यांविषयी लिहिले होते.
पोलीस ठाण्याच्या आवारात या सर्वांनी पोलीस अधिकार्यांसमोर शपथ घेत सांगितले, ‘आता आम्ही गोहत्या किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी होणार नाही. येथून पुढे आम्ही मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करू आणि समाजाचे उत्तरदायी नागरिक म्हणून जीवन जगू.’
पुन्हा गुन्हा केला, तर कठोर कारवाई करण्याची पोलिसांनी दिली चेतावणी !
पोलीस अधिकार्यांनी आरोपींना स्पष्ट शब्दांत चेतावणी दिली की, भविष्यात जर कोणतीही व्यक्ती पुन्हा गोहत्या किंवा इतर कोणत्याही गुन्ह्यात सहभागी आढळली, तर तिच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. गुन्हेगारीपासून दूर रहाण्याचे हे आश्वासन केवळ औपचारिक नसावे, तर ते प्रत्यक्ष व्यवहारात आणि स्वतःच्या आयुष्यात उतरवावे लागेल. तसेच जर त्यांच्या आजूबाजूला कुणी व्यक्ती गोहत्या किंवा इतर गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेली दिसली, तर त्याची माहिती त्यांनी त्वरित पोलिसांना द्यावी, जेणेकरून वेळेत कारवाई करता येईल.

लाख रुपयांचे मॅफेड्रोन जप्त; धर्मांध अटकेत !
धार्मिकदृष्ट्या जागरूक हिंदूच हिंदु राष्ट्रासाठी प्रभावीपणे कार्य करू शकतात ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
कोल्हापूर येथील डॉ. अश्विनी माळकर आणि श्रीमती शीलाताई माने यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
युवती आणि महिला यांच्या सुरक्षेसाठी ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ तात्काळ लागू करावा !
‘महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगा’चे अध्यक्ष पाशा पटेल ‘ॲग्रीकल्चर लीडरशिप अवॉर्ड’ने सन्मानित !
गोहत्या करणार्यांची शिक्षा आणि दंड यांत वाढ करा ! – सुधीर मुनगंटीवार, आमदार, भाजप