आतंकवाद्यांच्या कह्यात असल्याचा खोटा दावा करत उकळले पैसे !
मुझफ्फरपूर (बिहार) – येथे सामाजिक माध्यमाद्वारे ओळख वाढवून एका २१ वर्षीय हिंदु तरुणीची फसवणूक आणि लूट केल्याचा प्रकार समोर आला आहे. सकरा पोलीस ठाण्याच्या सीमेत रहाणार्या महंमद अरमान नावाच्या मुसलमान तरुणाने स्वतः सैनिक असल्याचे सांगून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर लग्नाचे आमीष दाखवून त्याने तरुणीकडून पैसे उकळले. कालांतराने तरुणीला ‘त्याचे आधीच लग्न झाले असून तो सायकलच्या दुकानात पंक्चर काढण्याचे काम करतो’, असे समजले. पीडित तरुणीने आरोपीच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.
१. पहिल्या भेटीपूर्वी अरमान याने सैनिकांसारखी केशरचना केली आणि सैन्याचा गणवेश परिधान करून तो तरुणीला भेटायला गेला.
२. व्हिडिओद्वारे संपर्क करतांना तो सैन्याचा गणवेश आणि शस्त्रेही दाखवायचा. कधी पाकिस्तानच्या सीमेवर तैनात असल्याचे खोटेच सांगायचा, तर कधी आतंकवाद्यांच्या कह्यात असल्याचा खोटा दावा करून पैशांची आवश्यकता असल्याचे भासवायचा.
३. त्याने वेगवेगळ्या वेळी पीडित हिंदु तरुणीकडून ‘ऑनलाइन’ पैसे मागवून घेतले होते. आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Karnavati Blasts 2008 : ३८ जिहादी आतंकवाद्यांची फाशी अन् ११ जणांची जन्मठेप गुजरात उच्च न्यायालयाने ठेवली कायम !
अमरनाथ यात्रेच्या पहिल्या ५ दिवसांतच गुहेतील नैसर्गिक बर्फाचे शिवलिंग वितळले
हिंदु मुलींचे ‘लव्ह जिहाद’पासून रक्षण करण्यासाठी समितीचे ‘बेटी सुरक्षित राष्ट्र सुरक्षित’ अभियान ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती
कर्नाटकात काँग्रेस सरकार आल्यापासून हिंदूंवरील अत्याचारांत वाढ ! – भाजप
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या ७० घटना सीसीटीव्हीमध्ये झाल्या चित्रीत !
कर्नाटकातील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला संघाच्या नेत्याने बजावली कायदेशीर नोटीस