पाण्याच्या २ टाक्या आणि विश्रांती कक्ष आढळला

पुणे – मावळ तालुक्यातील विसापूर दुर्गाच्या उत्तर बाजूस प्राचीन भुयार काही दिवसांपूर्वी सापडले होते. आता दुर्गाच्या दक्षिण भागात आणखी एक अपरिचित लेणीचा शोध लागला आहे. मावळातील ‘सफर ३६१’ दुर्गांची सामाजिक प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ही लेणी शोधून काढली. इतिहास अभ्यासकांच्या मते ही लेणी अद्याप लोकपरिचित नसल्याचे मानले जाते.
प्रतिष्ठानचे सदस्य मालेवाडी येथील प्राचीन वनदेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते. विसापूर दुर्गाच्या कातळात झाडाझुडपांच्या आड लेणीसदृश्य रचना त्यांच्या दृष्टीस आली. त्या जागेची प्रत्यक्ष पहाणी केली असता ही अर्धवट कोरलेली प्राचीन लेणी निदर्शनास आली. या लेणीत २ कोरीव पाण्याच्या टाक्या, विश्रांतीसाठी सिद्ध केलेला एक कक्ष आढळला. २ टाक्यांपैकी १ लहान असून ते सध्या कोरडे आहे, दुसरी टाकी आकाराने मोठी असून त्यात पाणीसाठा आहे. भूमीपासून अनुमाने ४ फूट उंचीवर विश्रांतीसाठी कोरलेला कक्ष दिसून येतो. या लेणीच्या तोंडावर काही खापराचे तुकडेही मिळाले.
इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे म्हणाले, ‘‘लेणी निर्माण करतांना प्रथम काताळावर सीमा आखून खोदकाम चालू केल्याचे दिसून येते. पाणी बाहेर निथळावे आणि आतील भाग कोरडा रहावा यासाठी केलेली रचना आहे. ही रचना दुर्मिळ प्रकारात मोडते. समोरील भागात पाण्याचे टाके निर्माण केले, तसेच उंचावर खोबणी खोदलेली आढळून येते.’’
कबुतरांद्वारे पसरणार्या फुफ्फुसांच्या व्याधींविषयी तज्ञांची समिती स्थापन करावी ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा
८ जुलैपासून पावसात घट; शेतकर्यांनी हवामानानुसार शेतीचे नियोजन करावे ! – कृषी विभाग
वर्धा येथील ‘गोरस भंडारा’वरील ‘एफ्.डी.ए.’ची कारवाई अवैध !
संगम माहुलीच्या (सातारा) पुलावरून नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास !
‘गोकुळ’च्या अपकिर्तीच्या विरोधात आज शेतकर्यांसमवेत आत्मक्लेश आंदोलन ! – डॉ. युवराज येडूरे, सामाजिक कार्यकर्ते
धोकादायक पर्यटनस्थळे, धबधबे, तलाव आणि नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध !