
मुंबई – ‘ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’ने शैक्षणिक सत्र २०२५-२६ या काळात संसाधने आणि प्राध्यापक यांच्या कमतेरतेमुळे देशभरातील ५८ अभियांत्रिकी आणि तांत्रिक महाविद्यालये बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. यात महाराष्ट्रातील १२ महाविद्यालयांचा समावेश आहे. तथापि ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश या महाविद्यालयांमध्ये आधीच झाले आहेत, त्यांना अर्धवट सोडले जाणार नाही.
ही कारवाई केवळ महाविद्यालय बंद करण्यापुरती मर्यादित नाही. याच काळात देशभरातील विविध तांत्रिक संस्थांमध्ये चालू असलेले ९५० हून अधिक अभ्यासक्रमही कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत. ज्या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना रस नव्हता किंवा ज्यांना चालवण्यासाठी महाविद्यालयाकडे योग्य संसाधने नव्हती, त्यांना सूचीतून वगळण्यात आले आहेत.
संगम माहुलीच्या (सातारा) पुलावरून नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास !
‘गोकुळ’च्या अपकिर्तीच्या विरोधात आज शेतकर्यांसमवेत आत्मक्लेश आंदोलन ! – डॉ. युवराज येडूरे, सामाजिक कार्यकर्ते
मावळ तालुक्यातील विसापूर दुर्गावर सापडली अपरिचित लेणी !
धोकादायक पर्यटनस्थळे, धबधबे, तलाव आणि नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध !
पुणे महापालिकेची विक्रमी मिळकतकर वसुली : पहिल्या तिमाहीत १ सहस्र ३९५ कोटी !
ठाणे येथे गटाराच्या पाण्यात मक्याची कणसे धुतली