अमरनाथ यात्रेच्या पहिल्या ५ दिवसांतच गुहेतील नैसर्गिक बर्फाचे शिवलिंग वितळले

३ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन शेष

अमरनाथ गुहेतील नैसर्गिक बर्फाचे शिवलिंग जवळजवळ पूर्णपणे वितळले

अमरनाथ (जम्मू-काश्मीर) – येथील अमरनाथ गुहेतील नैसर्गिक बर्फाचे शिवलिंग जवळजवळ पूर्णपणे वितळले आहे. यात्रा चालू होऊन केवळ ५ दिवस झाले असून अजून ५४ दिवस ही यात्रा चालू रहाणार आहे. गेल्या ४ दिवसांत ८६ सहस्र भाविकांनी पवित्र गुहेत दर्शन घेतले. ही संख्या प्रतिदिन १ लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. यात्रेसाठी यावर्षी ४ लाख भाविकांनी नोंदणी केली आहे.

२३ मे या दिवशी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी प्रसारित केलेल्या छायाचित्रात शिवलिंगाचा आकार ७ फूट होता. २९ जूनच्या पहिल्या पूजेच्या दिवशीही शिवलिंगाची उंची ५ फुटांपेक्षा अधिक होती. ६ जुलै या दिवशी समोर आलेल्या छायाचित्रामध्ये ते ९० टक्के वितळल्याचे दिसून आले.