कोल्हापूर – जिल्ह्यातील सर्व शेतकरी परिवाराची आर्थिक, सर्वांगिण प्रगतीसाठी मोलाचे योगदान देत असलेल्या ‘गोकुळ’ची निवडणूक पार्श्वभूमीवर चालू असलेल्या अपकीर्तीसाठी ८ जुलैला ‘आत्मक्लेश आंदोलन’ करण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते युवराज येडुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. येडुरे पुढे म्हणाले, ‘‘अलीकडच्या काळात गोकुळ दूध संघाभोवती चालू असलेले आरोप-प्रत्यारोप, राजकीय संघर्ष, अपकीर्तीची मोहीम आणि स्वार्थी राजकारण यामुळे संघाची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे या संस्थेची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि स्वायत्तता कायम राखणे हे सर्वांचे दायित्व आहे. याच पार्श्वभूमीवर मी एक सामान्य दूध उत्पादक, सभासद आणि या संस्थेचा हितचिंतक म्हणून ‘गोकुळ’च्या अस्तित्वाचे, प्रतिष्ठेचे आणि हिताचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.’’

कबुतरांद्वारे पसरणार्या फुफ्फुसांच्या व्याधींविषयी तज्ञांची समिती स्थापन करावी ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा
८ जुलैपासून पावसात घट; शेतकर्यांनी हवामानानुसार शेतीचे नियोजन करावे ! – कृषी विभाग
वर्धा येथील ‘गोरस भंडारा’वरील ‘एफ्.डी.ए.’ची कारवाई अवैध !
संगम माहुलीच्या (सातारा) पुलावरून नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास !
मावळ तालुक्यातील विसापूर दुर्गावर सापडली अपरिचित लेणी !
धोकादायक पर्यटनस्थळे, धबधबे, तलाव आणि नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध !