फुरसुंगी (पुणे) येथे सरकारी नोकरीच्या आमिषाने १५ लाख रुपयांची फसवणूक !

पुणे, ७ जुलै (वार्ता.) – ‘मुलाला शासकीय नोकरी लावतो’, असे सांगत फुरसुंगी (पुणे) येथे एका व्यक्तीची १५ लाख रुपयांची फसवणूक केली. आरोपी साक्षर रो. म्हस्के, बाळासाहेब पाटील, अनिल आ. नवले यांनी देवपूर (जि. धुळे) येथील तक्रारदार व्यक्तीच्या मुलाला शासकीय नोकरी लावतो, असे सांगत वर्ष २०२१ पासून २२ लाख ४५ सहस्र रुपये घेतले. मुलाला नोकरी न मिळाल्याने आरोपींनी तक्रारदारांना ७ लाख २८ सहस्र रुपये परत दिले. उर्वरित १५ लाख १७ सहस्र रुपये परत न मिळाल्याने तक्रारदारांनी पोलिसात तक्रार प्रविष्ट केली.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारे फसवणूक करणार्‍यांना पोलिसांचे भय नसणे, हे संतापजनक आहे. अशांना त्वरित कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !