अतीवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी’चा निर्णय

आळंदी, ७ जुलै (वार्ता.) – महाराष्ट्रातील मुसळधार पावसामुळे आळंदी येथे इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. पूरस्थितीमुळे आळंदीतील वाहतूक ठप्प झाली असून पुलाचे कठडे, विजेचे खांब आणि सोहळ्यासाठी आणलेली फिरती शौचालये वाहून गेली आहेत. ‘वॉटरहाऊस’ पाण्याखाली गेल्याने पिण्याच्या पाण्याची आणि निवासाची व्यवस्था करणे अशक्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर ८ जुलैला दुपारी ३ वाजता होणारा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा संजीवन समाधी मंदिरात अत्यंत मर्यादित स्वरूपात करण्याचा निर्णय ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी’ने घेतला आहे. या सोहळ्याला परंपरेतील मानकरी, दिंडीप्रमुख, पोलीस आणि निवडक वारकरी मिळून केवळ १ सहस्र ६६० व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल.
पूर आणि गंभीर परिस्थिती पहाता वारकरी बांधवांनी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीला येऊ नये, असे आवाहन प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे आणि पालखी सोहळा प्रमुख अधिवक्ता राजेंद्र उमाप यांनी केले आहे. पुढील मुक्कामाच्या सोहळ्याविषयी कमिटी नंतर स्वतंत्र निवेदन प्रसिद्ध करील.
संगम माहुलीच्या (सातारा) पुलावरून नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास !
‘गोकुळ’च्या अपकिर्तीच्या विरोधात आज शेतकर्यांसमवेत आत्मक्लेश आंदोलन ! – डॉ. युवराज येडूरे, सामाजिक कार्यकर्ते
मावळ तालुक्यातील विसापूर दुर्गावर सापडली अपरिचित लेणी !
धोकादायक पर्यटनस्थळे, धबधबे, तलाव आणि नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध !
पुणे महापालिकेची विक्रमी मिळकतकर वसुली : पहिल्या तिमाहीत १ सहस्र ३९५ कोटी !
ठाणे येथे गटाराच्या पाण्यात मक्याची कणसे धुतली