पुणे – आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत पुणे महापालिकेच्या मिळकतकरातून १ सहस्र ३९५ कोटी ८६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यंदा ७ लाख ४० सहस्र २८२ मालमत्ताधारकांनी कर भरला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ६ लाख ८६ सहस्र ७१२ मालमत्तांधारकांकडून १ सहस्र २९२ कोटी ९४ लाख रुपयांचे संकलन झाले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत १०२ कोटी ९२ लाख रुपयांनी उत्पन्न अधिक आहे.
शहरात विविध विकासकामे चालू असून त्यासाठी आवश्यक निधी उभारण्यासाठी मिळकत कर विभागावर प्रमुख दायित्व असते. महापालिकेच्या वतीने दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत मिळकतकरावर ५ ते १० टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे या २ महिन्यात बहुतांश नागरिक कर भरतात. यंदा या २ महिन्यांत १२०० कोटी ४७ लाख रुपये रक्कम जमा झाली आहे. त्यानंतर पुढील एका महिन्यात जवळपास २०० कोटी रुपये जमा झाले आहेत. कर भरणा करण्यामध्ये पुणेकरांकडून ऑनलाईन व्यवहारांना प्राधान्य दिले जात आहे. ५ लाख ४१ सहस्र ५०० मालमत्ताधारकांनी ऑनलाईन पद्धतीने ९२७ कोटी २ लाख रुपये भरले, तर रोख व्यवहारातून ११४ कोटी ३८ लाख आणि धनादेश/डीडीद्वारे ३५४ कोटी ४६ लाख रुपये जमा झाले आहेत, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

कबुतरांद्वारे पसरणार्या फुफ्फुसांच्या व्याधींविषयी तज्ञांची समिती स्थापन करावी ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा
८ जुलैपासून पावसात घट; शेतकर्यांनी हवामानानुसार शेतीचे नियोजन करावे ! – कृषी विभाग
वर्धा येथील ‘गोरस भंडारा’वरील ‘एफ्.डी.ए.’ची कारवाई अवैध !
संगम माहुलीच्या (सातारा) पुलावरून नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास !
‘गोकुळ’च्या अपकिर्तीच्या विरोधात आज शेतकर्यांसमवेत आत्मक्लेश आंदोलन ! – डॉ. युवराज येडूरे, सामाजिक कार्यकर्ते
मावळ तालुक्यातील विसापूर दुर्गावर सापडली अपरिचित लेणी !