आषाढी यात्रेच्या कालावधीत पंढरपूर शहर मद्य-मांसमुक्त घोषित करण्याची ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची मागणी !

तहसीलदार श्रीमती सरस्वती पाटील यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

सोलापूर – आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर २२ ते २९ जुलै या कालावधीत पंढरपूर शहर मद्य-मांसमुक्त घोषित करावे, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली. तहसीलदार श्रीमती सरस्वती पाटील यांनी हे निवेदन स्वीकारले. निवेदनात लाखो वारकरी आणि भाविक पंढरपूर येथे येत असल्याने यात्रेची पवित्रता, सात्त्विक वातावरण आणि धार्मिक परंपरा टिकून रहाव्यात, यासाठी मद्य आणि मांसविक्रीवर बंदी घालण्याचे प्रशासकीय परिपत्रक काढावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

या वेळी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे जिल्हा संघटक विनोद रसाळ, धनंजय बोकडे, रोहन कलशेट्टी आदी उपस्थित होते, तसेच या निवेदनावर १५ मंदिरांचे विश्वस्त, पुजारी आणि पुरोहित यांनी स्वाक्षर्‍या केल्या. यामध्ये ‘महासिद्ध देवस्थान’चे पुजारी संतोष पुजारी, ‘वैष्णव मारुति देवस्थान’चे नारायण दुभाषी, श्री हनुमान मंदिर (जोड बसवण्णा चौक) येथील श्रीनिवास गुर्रम, ‘पोषमा देवस्थान’चे प्रकाश चन्ना, व्यंकटेश देवस्थान (पाटकुल) येथील आबासाहेब शिंदे, तसेच पुरोहित संघटनेचे व्यंकटेश जिल्ला, बालराज दोन्तुल आणि विनायक कोरे यांचा समावेश आहे.

संपादकीय भूमिका

  • अशी मागणी का करावी लागते ? 
  • प्रशासन स्वतःहून हा निर्णय का घेत नाही ?