ठाणे येथे गटाराच्या पाण्यात मक्याची कणसे धुतली

गटाराच्या पाण्यात मक्याची कणसे धुतली

ठाणे – येथील जांभळी नाका भाजी बाजारामध्ये एका विक्रेत्याने गटाराच्या रस्त्यावरून वहाणार्‍या पाण्यात मक्याची कणसे धुतल्याचा प्रकार सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. त्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. अन्नसुरक्षेशी निष्काळजीपणा केल्याचा आरोप करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित विक्रेत्याला जाब विचारत चोप दिला.