सीरियाची राजधानी दमास्कस जेथे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थांबले होते, त्या भागात लागोपाठ ४ बाँबस्फोट : ३ जणांचा मृत्यू

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीच्या वेळीच झाले हे बाँबस्फोट

दमास्कस (सीरिया) – सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये ७ जुलैला लागोपाठ ४ बाँबस्फोट झाले. यात ३ जणांचा मृत्यू झाला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सीरियाचे राष्ट्राध्यक्ष अहमद अल्-शरा यांच्या भेटीसाठी राष्ट्रपती भवनात असतांना शहरातील ‘फोर सीझन्स’ हॉटेलच्या परिसरात हे स्फोट झाले. या हॉटेलमधून इमॅन्युएल मॅक्रॉन अवघ्या २५ मिनिटांपूर्वीच बाहेर पडले होते. सध्या कोणत्याही संघटनेने या घटनेचे दायित्व स्वीकारलेले नाही. सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाचे अन्वेषण करत आहे. सीरियामध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर युरोपीय नेत्याचा हा पहिलाच दौरा आहे.