
पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यानिमित्त १० ते १५ जुलै या कालावधीत पुण्याच्या ग्रामीण भागातील वाहतुकीत मोठे पालट करण्यात आले आहेत. पालखी मार्गावरील ७ ते ८ लाख भाविकांची सुरक्षा आणि संभाव्य वाहतूककोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पर्यायी मार्ग घोषित केले आहेत. पालखी १३ जुलै या दिवशी जेजुरी, १४ जुलै या दिवशी वाल्हा आणि १५ जुलै या दिवशी निरा येथे मुक्कामी असेल.
प्रमुख पर्यायी मार्ग खालीलप्रमाणे
सातारा, फलटण, लोणंद ते पुणे – निरा आणि जेऊर फाट्यावरून पुणेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. ही वाहने निरा-मोरगाव-सुपा-कडेगाव चौफुला मार्गे किंवा मांडकी-वीर-सारोळा-सातारा हायवे मार्गे पुणेकडे जातील. बारामती, सातारा ते पुणे (जेजुरी मार्ग) – ही वाहतूक बेलसर फाटा-वाघापूर चौक ते उरुळी कांचन मार्गे वळवण्यात आली आहे.
पुणे ते सातारा, फलटण, बारामती – पुणे बाजूकडून जेजुरीकडे जाणारी वाहने सासवड-नारायणपूर-कापूरहोळ मार्गे किंवा पिसर्वे-सुपा मार्गे बारामती आणि फलटणकडे जातील.
लोणंद ते पुणे – लोणंद बाजूकडून निरा मार्गे पुणेकडे येणारी वाहतूक बंद राहील. ती लोणंद-शिरवळ-कापूरहोळ-खेड शिवापूर मार्गे जाईल.
पालखी सोहळ्याच्या काळात वाहनधारकांनी सहकार्य करावे आणि या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
‘गोकुळ’च्या अपकिर्तीच्या विरोधात आज शेतकर्यांसमवेत आत्मक्लेश आंदोलन ! – डॉ. युवराज येडूरे, सामाजिक कार्यकर्ते
मावळ तालुक्यातील विसापूर दुर्गावर सापडली अपरिचित लेणी !
धोकादायक पर्यटनस्थळे, धबधबे, तलाव आणि नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध !
पुणे महापालिकेची विक्रमी मिळकतकर वसुली : पहिल्या तिमाहीत १ सहस्र ३९५ कोटी !
ठाणे येथे गटाराच्या पाण्यात मक्याची कणसे धुतली
पुणे शहरात ६ दिवसांत पडला महिन्याभराचा पाऊस !