पाक अधिकार्यांसोबत गुप्त बैठक घेतल्याचा केला होता आरोप

बेंगळुरू (कर्नाटक) – रा.स्व. संघाचे नेते राम माधव यांनी पाकिस्तानच्या अधिकार्यांशी गुप्तपणे चर्चा केली, असा गंभीर आरोप कर्नाटकातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बी.के. हरिप्रसाद यांनी शहरात नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. या संदर्भात राम माधव यांनी हरिप्रसाद यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. ‘माझी प्रतिष्ठा आणि प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने हे खोटे विधान करण्यात आले आहे’, असे म्हणत राम माधव यांनी भारतीय न्याय संहिता कलम ३५६ च्या अंतर्गत कारवाई करण्याची चेतावणी दिली आहे. ‘हरिप्रसाद यांनी त्यांच्या विधानाविषयी तात्काळ क्षमा मागावी’, असे नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
लंडन येथील हिल्टन हॉटेलमध्ये राम माधव यांनी पाकिस्तानच्या ‘आय.एस्.आय.’च्या (इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणेच्या) माजी मेजर जनरलसोबत एकूण ४ वेळा गुप्त बैठका घेतल्या आहेत, असा आरोप हरिप्रसाद यांनी केला होता.
Karnavati Blasts 2008 : ३८ जिहादी आतंकवाद्यांची फाशी अन् ११ जणांची जन्मठेप गुजरात उच्च न्यायालयाने ठेवली कायम !
अमरनाथ यात्रेच्या पहिल्या ५ दिवसांतच गुहेतील नैसर्गिक बर्फाचे शिवलिंग वितळले
हिंदु मुलींचे ‘लव्ह जिहाद’पासून रक्षण करण्यासाठी समितीचे ‘बेटी सुरक्षित राष्ट्र सुरक्षित’ अभियान ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती
कर्नाटकात काँग्रेस सरकार आल्यापासून हिंदूंवरील अत्याचारांत वाढ ! – भाजप
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या ७० घटना सीसीटीव्हीमध्ये झाल्या चित्रीत !
बांगलादेशाने भारताचा चुकीचा नकाशा दाखवला !