
मुंबई, ७ जुलै (वार्ता.) – हॉटेल्स, उपहारगृहे, बार यांमधील महिलांच्या अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालणारे महत्त्वाचे सुधारणा विधेयक ७ जुलै या दिवशी विधानसभेत संमत करण्यात आले. ‘महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान कक्ष यांमधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम, २०२६’ असे या विधेयकाचे नाव आहे. गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले. तालिका सभापती समीर कुणावर यांनी हे विधेयक सभागृहात संमत झाल्याचे घोषित केले.
यापूर्वी वर्ष २०१६ मध्ये डान्स बारमधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध आणण्यासाठी याविषयीचे मूळ विधेयक आणण्यात आले होते; परंतु यातून पळवाट काढण्यासाठी ‘महाराष्ट्र पोलीस अधिनियमाअन्वये दिलेल्या प्रत्यक्ष संगीत सादरीकरणांच्या (ऑर्केस्टा) परवान्याचा उपयोग केला जाऊ लागला. महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या आधारे प्राप्त होणार्या संगीत सादरीकरणाच्या अंतर्गत राज्यात हॉटेल्स, उपहारगृहे, बार यांमध्ये अश्लील नृत्ये सादर करण्यात येत आहेत. ही पळवाट रोखण्यासाठी संगीत सादरीकरणालाही (ऑर्केस्ट्रा) या सुधारित अधिनियमाच्या अंतर्गत आणण्यात आले आहे. त्यामुळे संगीत सादरीकरणाच्या नावाखाली चालणार्या अश्लील नृत्यांवरही पोलिसांना कारवाई करता येणार आहे. याविषयी आमदार अमित साटक, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार सुमित वानखेडे, आमदार संजय केळकर आदींनी या सुधारित कायद्याविषयीची मत सभागृहात व्यक्त केले.
‘गोकुळ’च्या अपकिर्तीच्या विरोधात आज शेतकर्यांसमवेत आत्मक्लेश आंदोलन ! – डॉ. युवराज येडूरे, सामाजिक कार्यकर्ते
मावळ तालुक्यातील विसापूर दुर्गावर सापडली अपरिचित लेणी !
धोकादायक पर्यटनस्थळे, धबधबे, तलाव आणि नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध !
पुणे महापालिकेची विक्रमी मिळकतकर वसुली : पहिल्या तिमाहीत १ सहस्र ३९५ कोटी !
ठाणे येथे गटाराच्या पाण्यात मक्याची कणसे धुतली
पुणे शहरात ६ दिवसांत पडला महिन्याभराचा पाऊस !