सातारा जिल्हाधिकार्यांचे निर्देश
सातारा, ७ जुलै (वार्ता.) – भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज’ (मध्यम) आणि ‘रेड अलर्ट’ (उच्च धोका) दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अतीवृष्टी काळात करावयाच्या तात्काळ उपाययोजना आणि आपत्ती व्यवस्थापनाविषयी व्यापक आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई आणि सातारा या डोंगराळ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे, भूस्खलन, तसेच संपर्क यंत्रणा खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत.
धोकादायक पर्यटनस्थळे, धबधबे, तलाव आणि नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. अपघातप्रवण ठिकाणी ‘प्रवेश निषिद्ध’ आणि ‘धोकादायक क्षेत्र’ असे फलक लावण्याविषयी निर्देश दिले आहेत.
तसेच प्रमुख पर्यटनस्थळांवर गर्दी नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरडप्रवण आणि अतीधोकादायक भागांतील नागरिक, तसेच मोडकळीस आलेल्या घरांमध्ये रहाणार्या कुटुंबांना तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ओढे, नाले आणि नद्यांना पूर आल्यास किंवा पुलांवरून पाणी वहात असल्यास संबंधित मार्ग तात्काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. सर्व तहसील कार्यालये, नगर परिषदा आणि पंचायत समिती यांनी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष २४ घंटे कार्यरत ठेवावेत. तलाठी, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांनी मुख्यालयी रहावे. आदेशांचे उल्लंघन करणार्या व्यक्ती अथवा संस्था यांविरुद्ध ‘आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५’ अन्वये कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकार्यांकडून स्पष्ट केले आहे.

कबुतरांद्वारे पसरणार्या फुफ्फुसांच्या व्याधींविषयी तज्ञांची समिती स्थापन करावी ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा
८ जुलैपासून पावसात घट; शेतकर्यांनी हवामानानुसार शेतीचे नियोजन करावे ! – कृषी विभाग
वर्धा येथील ‘गोरस भंडारा’वरील ‘एफ्.डी.ए.’ची कारवाई अवैध !
संगम माहुलीच्या (सातारा) पुलावरून नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास !
‘गोकुळ’च्या अपकिर्तीच्या विरोधात आज शेतकर्यांसमवेत आत्मक्लेश आंदोलन ! – डॉ. युवराज येडूरे, सामाजिक कार्यकर्ते
मावळ तालुक्यातील विसापूर दुर्गावर सापडली अपरिचित लेणी !