१. जीवनात दुःख आले, तरी देवाला दूषणे न देता मार्गक्रमण करणे आवश्यक !
‘प्रत्येक जण या भारतभूमीरूपी व्यासपिठावर विविध भूमिकेत आपापले कार्य करत आहे. आपण सनातन धर्मीय असल्याने प्रत्येकाने प्रतिदिन सकाळी उठून त्या परमात्म्याचे स्मरण करावे आणि त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्याला नमन करावे. परमात्म्याच्या कृपेविना या जगात झाडाचे पानही हलू शकत नाही. जीवनात कधीही भगवंताला दोष देऊ नये आणि जीवनातील कोणत्याही गोष्टीचा त्रागा करून दुःखी होऊ नये. भगवंत कुणालाही दुःख देत नाही. आपणच चुकीची कामे करून दुःखी होतो. तो चांगल्या कार्यासाठी कदाचित् आपली परीक्षा घेत असेल. त्या मार्गावर चालत असतांना काटेकुटे, दगड, खोल खड्डे आणि मोठमोठ्या दर्याही असतील; पण त्या कशा प्रकारे ओलांडायच्या, हा आपल्या चिंतनाचा विषय आहे. त्यामुळे जीवनात दुःख आले, तरी देवाला दूषणे देऊ नयेत.
महामंडलेश्वर श्री नर्मदा शंकरपुरीजी महाराज यांचा परिचय

महामंडलेश्वर श्री नर्मदा शंकरपुरीजी महाराज हे प्रवचनांच्या माध्यमातून जनजागृती करतात. ते श्री निरंजनी आखाड्याचे ‘महामंडलेश्वर’ आहेत.
२. मानवाला चिंतन आणि मंथन करण्याचे सामर्थ्य
त्या परमेश्वराने मला इतके श्रीमंत बनवले, चांगल्या कुटुंबात जन्माला घातले, सर्वकाही केले; पण आयुष्याच्या शेवटी त्या ईश्वरासाठी, सनातन धर्मासाठी किंवा समाजासाठी काही चांगले कार्य केल्याचे मला आठवतच नसेल आणि माझ्या निधनानंतर लोकांनी माझे स्मरण करावे, असे वाटत असेल, तर थोर लोक ज्या मार्गाने जातात, त्याच मार्गाने जाण्यात लाभ असतो. जो परमार्थी आहे आणि ज्याला प्रपंच अन् मायेतील विषयांत वैराग्य आले आहे, अशा जीवाला ‘जागा झाला’, असे म्हणतात. हा मृत्यूलोक आहे. येथे व्यावहारिक कृत्ये करावी लागतील आणि त्यापुढे जाऊन ‘नरापासून नारायण होण्यासाठी’ प्रयत्नही करावे लागतील. देवाला जे द्यायचे असते, ते तो जन्मासमवेतच देत असतो. त्यामुळे सुख-दु:ख दोन्ही आपलीच आहेत; कारण संसाराचे चक्र गोलाकार आहे; म्हणून चिंतन आणि मंथन करण्याचे सामर्थ्य देवाने आम्हाला दिले आहे.
३. मनातील वाईट विचार नष्ट झाल्यावरच ईश्वरी कार्याशी एकरूप होऊन यशस्वी होता येईल !
भगवंताने नाण्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची २ रूपे बनवली आहेत. देवाने चांगले निर्माण केले आहे, तसे त्याने वाईटही निर्माण केले आहे. देवाने आपली परीक्षा घेण्यासाठी अनेक प्रकारचे पैलू सिद्ध केले आहेत. आपल्याकडून चूक झाली, असे वाटत असेल, तर शरणागतभावाने क्षमायाचना करण्याखेरीज दुसरा पर्याय नाही. आपण मोठमोठ्या चुका करू आणि देवाला सुवर्णभूषणे देऊन आपण चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत असू, तर देव आपल्याला क्षमा करणार नाही. त्यामुळे जीवनाला अवनतीपासून दूर ठेवण्यासाठी आपल्याला ध्यान, साधना आणि जप करण्याची आवश्यकता आहे. कितीही सत्संग मिळवला, तरी आपण आपला स्वत:चा सूर ईश्वराच्या सुरात एकरूप करू, तेव्हाच आपली सर्व कामे आपोआप आपल्या हिताची चांगली होऊ लागतील.
सनातनच्या आश्रमात परमात्म्याची शक्ती कार्यरत !

मी गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिली. मी आश्रम बघत असतांना स्वयंपाकघरात गेलो. तेथे काही साधक-साधिका भाजी चिरण्याची सेवा करत होत्या, तेव्हा मला भाजीचे प्रत्येक पान बोलत असल्याचे जाणवले. आश्रम आणि परिसर पहात असतांना मला अनेक अनुभूती आल्या. ती प्रत्येक अनुभूती स्वतः अनुभवण्यासाठी आहे. कुणी मान्य करो वा न करो, मी सनातनचा आश्रम प्रत्यक्षात अनुभवला, तेव्हा वाटले खरोखरच तेथे परमात्म्याची शक्ती कार्यरत आहे.’
– महामंडलेश्वर नर्मदा शंकरपुरीजी महाराज
संकटे, कष्ट, पीडा, इत्यादी येतीलच आणि येणारच आहेत. त्यांना कुणी थांबवू शकत नाही. जे कार्य आपल्याला मिळाले आहे, मग ते कोणतेही असो, दगड उचलण्याचे असो, ते मनापासून करा. सेवा भावपूर्ण करत रहा. कोणत्याही स्थितीत अहंभाव निर्माण व्हायला नको. जेव्हा आपल्यातील वाईट विचार नष्ट होतील, तेव्हाच आपण या ईश्वरी कार्याशी एकरूप होऊ आणि यशस्वीही होऊ. त्यामुळे स्वतःची नित्य कर्मे, गोरगरिबांची सेवा आणि मानवता धर्म यांमध्ये स्वत:ला झोकून द्या. परिणामाचा विचार करू नका, तसेच कौतुकाचीही अपेक्षा करू नका. कोणतेही काम आध्यात्मिक दृष्टीने योग्य केल्यास त्याचा परिणाम चांगला होईल.’
– महामंडलेश्वर नर्मदा शंकरपुरीजी महाराज, निरंजनी आखाडा, जयपूर, राजस्थान.

हे म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादी !
वारी : महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाची अमूल्य परंपरा !
‘ओव्हेरियन सिस्ट’ आणि आयुर्वेद
‘यू.एस्. इंडो-पॅसिफिक कमांड’चे ‘यू.एस्. पॅसिफिक कमांड’मध्ये नामांतर : भारतासाठी संदेश, परिणाम आणि पुढील दिशा
पावसाळ्याच्या काळात वाढत असलेली सांधेदुखी आणि पाठदुखी यांविषयी घ्यावयाची काळजी
सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने साधिकेला झालेले लाभ !